वाशीम,
Vasudevananda Saraswati Maharaj प.पू. पंडितकाका धनागरे महाराज सहस्रचंद्र वर्ष व चातुर्मास्य श्रौत याग निमित्त श्री क्षेत्र गरुडेश्वर येथून प.पू. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती टेम्बे स्वामी महाराज यांचे विग्रह स्वरूपात वाशीम शहरात आगमन झाले. त्यावेळी शहरात ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. शहरातील चरखा फॅशन येथे वासुदेवानंद महाराजांचे स्वागत, आरती, पूजा संपन्न झाली. त्यानंतर पालखीत बसून वासुदेवानंद महाराज यांची शोभायात्रा काढण्यात आली.

या शोभयात्रेत भक्तगणांची उपस्थिती लक्षणीय होती. ही शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गावरुन वाजत गाजत श्री वासुदेव आश्रम येथे पोहचली. याठिकाणी विजयकाका पोफळी यांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी दत्त नामाने व महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर आनंदून गेला होता. Vasudevananda Saraswati Maharaj स्थानिक श्री वासुदेव आश्रम दत्त नर्मदा मंदिर टिळक चौक येथे २० ते २६ नोव्हेंबर दरम्यान पंडित काका धनागरे महाराज सहस्त्र चंद्रदर्शन वर्षानिमीत्त श्रौत चातुर्मास याग या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सरसंघचालक मोहनजी भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह श्रीमद् सदगुरु शंकराचार्य महाराज, विद्याविश्वेवर भारती शंकराचार्य महास्वामी महाराज, गणेश्वरशास्त्री द्राविड गुरुजी, बाबासाहेब महाराज, शरदकाका जोशी पुणे, जितेंद्र महाराज अंजनगाव सुर्जी, विठ्ठल महाराज नेमावर मध्यप्रदेश, सखाराम महाराज जोशी लोणी आदीची उपस्थिती लाभणार आहे.