ताडोबाची अनभिषिक्त राणी ‘माया’चा अंत

    दिनांक :19-Nov-2023
Total Views |
चंद्रपूर, 
प्रबळ वाघ म्हणून ओळखल्या जाणार्‍या बजरंगचा 14 नोव्हेंबर रोजी एका झुंजीत झालेल्या मृत्यूनंतर शनिवारी उशिरा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून आणखी एक वाईट बातमी आली. ताडोबाची अनभिषिक्त राणी म्हणून लौकिक असलेल्या 'Maya' tigress ‘माया’ वाघिणीचाही अंत झाला. तिचा केवळ सांगाडाच वनकर्मचार्‍यांना सापडला. 25 ऑगस्टपासून ती बेपत्ता होती. सापडलेल्या अवशेषावरून ती मायाच होती, असा ठाम निष्कर्ष काढल्या जात आहे. डिएनए विश्लेषणाची तेवढी औपचारिकता शिल्लक असून, या बातमीमुळे हजारो वन्यप्रेमी हळहळ व्यक्त करीत आहे.
 
 
'Maya' tigress
 
पर्यटकांचा जीव की प्राण असलेल्या माया वाघिणीचे अधिकृत आणि वन विभागाच्या लेखी असलेले नाव ‘टी-12’ होते. केवळ प्रसुतीदरम्यानच ती खोल जंगलात जायची. अन्यथा तिचे पर्यटकांना कायम दर्शन होत असे. मात्र, गेल्या 25 ऑगस्टपासून ती अचानकपणे बेपत्ता झाली. वन विभागाने तिची शोधमोहिम सुरू केली असली, तरी 'Maya' tigress माया पुन्हा एकदा आई होणार असल्यानेच ती दाट जंगलात जाऊन राहत असावी, असा अंदाज वनाधिकारी व्यक्त केला होता. ताडोबा तलावाजवळील पंचधारा परिसरात वन कर्मचार्‍यांनी ऑगस्टमध्ये तिचे शेवटचे थेट दर्शन घेतले होते. मार्च ते मे 2023 दरम्यान ती शेवटची ‘कॅमेरा ट्रॅप’ मध्ये कैद झाली होती. मात्र, ताडोबा नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक 82 मध्ये शोध पथकांना शनिवारी काही अवशेष आढळून आले. त्या अवशेषांमध्ये वाघाच्या सांगाड्याचा समावेश होता. ते सुमारे 100 चौरस मिटर वनक्षेत्रात विखुरलेले होते.
 
 
जगातील सर्वात प्रसिद्ध आणि छायाचित्रित झालेली 'Maya' tigress माया वाघीण ताडोबा आणि कोलारा पर्वतरांगांचा संपूर्ण परिसर पादाक्रांत करीत असे. सामान्यतः वाघांची आपली परिसीमा ठरली असते. माया वाघिणीचे साम्राज्यदेखील निश्चित होते. ज्या ठिकाणी तिचा सांगाडा आढळून आला तो भूगागही तिचाच होता. तिथे मानवी हस्तक्षेपाची चिन्ह आढळून आली नाही. त्यामुळे मायाचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकार्‍यांच्या माहितीनुसार, सदर अवशेष कुजण्याच्या प्रगत अवस्थेत होते. उत्तरीय तपासणीसाठी अवशेष योग्य नव्हते. गोळा केलेले काही नमुने तात्काळ बँगलोर येथील नॅशनल सेंटर फॉर सायन्स आणि सेंटर सेल्युलर अ‍ॅण्ड मॉलिक्युलर बायोलॉजी संस्थेकडे विश्लेषणासाठी पाठविले जाणार आहे. चालू असलेल्या वैज्ञानिक संशोधन व अभ्यासादरम्यान गोळा करण्यात आलेले अवशेष टी 12 वाघाच्या डीएनए नमुन्यांशी जुळले जाऊ शकतात. या संदर्भातील अहवाल 30 नोव्हेंबर 2023 प्राप्त होणार आहे.
 
 
ताडोबा प्रकल्पाच्या पांढरपवनी भागातील एक अत्यंत दमदार आणि आव्हान स्वीकारणारी वाघिण म्हणून मायाची ओळख होती. तिचा जन्म डिसेंबर 2010 मध्ये झाल्याची नोंद ताडोबा प्रकल्प व्यवस्थापानाकडे आहे. जून 2014 पासून तिने पाचदा शावकांना जन्म दिला. 2015, 2017, 2020 आणि 2022 मध्ये एकूण 13 शावकांचे योगदान ताडोबा प्रकल्पातील जैवविविधता वाढवण्यात महत्वपूर्ण राहिले. मध्यंतरी, व्याघ्र गणना कार्यक्रमांंतर्गत वनरक्षक स्वाती ढुमणे हिच्यावर मायाने हल्ला चढवून तिचा जीव घेतला होता. तेव्हा ती बरीच चर्चेत आली होती. मात्र, ताडोबातील प्रसिध्द वाघांचे एका पाठोपाठ जाणे वन विभागाला आणि पर्यटकांना दुःखदायी आहे. बेपत्ता झाल्यानंतर 'Maya' tigress माया सापडावी म्हणून ताडोबा प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांच्या मार्गदर्शनात बरेच प्रयत्न झाले होते. पण अखेर तिच्या मृत्यूचीच बातमी आली.
 
संघर्षमय जीवन जगणारी निडर वाघीण
टि-12 म्हणजेच, माया वाघिणीचे अवघे जीवन संघर्षात गेले. अगदी बालपणी तिची आई ‘लिला’ मायासह तीन बछड्यांना सोडून शिकारीसाठी बाहेर पडली आणि स्वतः शिकार्‍यांच्या तावडीत सापडली. आईचा विरह मायाला सहन करणे खुप कठीण गेले. कारण ती लिलाची आवडती लेक होती. बालपणापासूनच ती चंट आणि निडर होती. सर्वात लहान असूनही आपल्या भावा-बहिनींना ती दबक्यात ठेवत होती. पुढे तिने जगण्यासाठी संघर्ष केला. आपल्या पहिल्या प्रसुतीनंतर झालेल्या दोन बछड्यांना तिच्या परोक्ष कुत्र्यांनी शिकार बनवल्याचे दुःख बराच काळ तिला वेदना देत राहिले. आईविना ती स्वतःच शिकार शिकली आणि पुढे एक चांगली आई पण सिध्द झाली. मोठा काळ पांढरपौनी सारख्या क्षेत्रात तिने एकहाती सत्ता गाजवली. अन्य वाघ पर्यटकांना पाहून जंगलात शिरत असले तरी माया मात्र कितीही पर्यटकांची गर्दी असू दे जागची हलायची नाही आणि म्हणूनच ती सर्वांना लाडकी होती. पण ती थोडी चिडचिडी असल्याचेही काही वनाधिकारी सांगतात.