वायू प्रदूषणासंदर्भात न्यायालयाने फटकारले

air pollution

    दिनांक :02-Nov-2023
Total Views |
लाहोर :
air pollution: पंजाब प्रांतातील वायू प्रदूषणावरून लाहोर हायकोर्टाचे न्यायमूर्ती शाहीद यांनी लाहोर आयुक्तांना चांगलेच फटकारले आहे. लाहोर शहर सध्या जगातील सर्वांत प्रदूषित शहरांपैकी एक आहे. मागील सोमवारी येथील air pollution वायू गुणवत्ता सूचकांक (एक्यूआय) ४४७ पर्यंत पोहोचला होता.
 
air
 
सदर प्रकरण न्यायालयात पोहोचल्यानंतर प्रदूषण air pollution नियंत्रित करण्यात अपयशी ठरल्याने उच्च न्यायालयाने लाहोर शहर आयुक्तांना चांगलेच फटकारले. दुसरीकडे पंजाबच्या काळजीवाहू सरकारने पंजाब प्रांतात आपत्कालीन स्थिती घोषित केली आहे. सर्व शासकीय शाळा, महाविद्यालयांमध्ये सर्वांना एक महिन्यापर्यंत मुखाच्छादन वापरण्याची सूचना केली आहे. याशिवाय सर्वसामान्य नागरिकांनाही मुखाच्छादन वापरणे बंधनकारक केले आहे.