मुंबई,
Prakash Solunke: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत. मागील दोन महिन्यांपासून मी सुद्धा आंदोलनात सहभागी आहे. असे असतानाही काही समाजकंटकांनी आपल्या घरावर हल्ला केला, अशी माहिती माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळुंके Prakash Solunke यांनी दिली. आ. सोळुंके यांनी पत्रपरिषदेत आपल्यासह कुटुंबावर ओढविलेली स्थिती कथन केली.
घरावरील हल्ल्यासाठी आलेल्या सुमारे ३०० लोकांच्या जमावात मराठा समाजाशिवाय अन्य जातीचे लोक सहभागी होते. अवैध धंदे करणारे आणि राजकीय विरोधकांचाही सहभाग होता. यात काही शिक्षकही होते. हा जमाव शस्त्रांसह मोठे दगड, पेट्रोल बॉम्ब सुद्धा बाळगून होता. सर्वजण कट-कारस्थान करून माझ्या जीविताला हानी करण्याच्या हेतूने आले होते, असा आरोप आमदार सोळुंके Prakash Solunke यांनी केला.
घटनेच्या दिवशी अर्थात् ३० ऑक्टोबरला मी घरातच होतो. माजलगाव बंद करण्यात आले होते. काही तरुणांनी घरी येत मोठा जमाव माझ्या घरावर येणार आहे, अशी माहिती दिली. त्यांच्याशी चर्चा करावी, या उद्देशाने घरातच थांबलो. यानंतर घरावर जोरदार दगडफेक करण्यात आली. पुढे घडलेले सर्वांनीच बघितले. केवळ दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी पोलिसांकडे केली असल्याचेही त्यांनी Prakash Solunke सांगितले.