विजापूर,
Naxalites Murder : पोलिसांचा खबर्या असल्याचा संशय व्यक्त करून नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमध्ये एका व्यक्तीची हत्या केली तसेच निवडणूक अधिकार्यांना 7 नोव्हेंबर रोजी मतदान प्रकि‘येसाठी केंद्रावर न जाण्याचा इशारा दिला. प्राथमिक माहितीनुसार, बुधवार मध्यरात्री नक्षलवाद्यांनी गलगाम येथील रहिवासी मुचकी लिंगा या 40 वर्षीय व्यक्तीची दोरीने गळा आवळून हत्या केली आणि त्याचा मृतदेह विजापूर जिल्ह्यातील गलगाम आणि नादपल्ली गावांदरम्यान रस्त्याच्या कडेला फेकून दिला.
मुचकी लिंगा हा पोलिसांचा खबर्या म्हणून काम करतो, असा आरोप नक्षल्यांनी केला. या प्रकरणी सुरक्षा दलांनी नक्षल्यांची शोधमोहीम सुरू केली आहे, असे अधिकार्यांनी सांगितले. Naxalites Murder दुसर्या घटनेत, बुधवारी जिल्ह्यात प्रतिबंधित सीपीआय (माओवादी) पश्चिम बस्तर विभाग समितीने मतदान अधिकार्यांना इशारा देणारे पत्रक जारी केले. 7 नोव्हेंबरला या परिसरात मतदान होणार आहे आणि तुम्ही त्याची तयारी करीत आहात. पश्चिम बस्तर विभाग समितीने यापूर्वीच एक पत्रक जारी करून ‘खोट्या’ निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.
विजापूरमध्ये 245 मतदान केंद्रे आहेत आणि तुम्ही 6-7 नोव्हेंबरला ईव्हीएम घेऊन येणार आहात. तुमच्या सोबत सुरक्षा दले असतील, ज्यामुळे तुमच्या जीवाला धोका आहे. Naxalites Murder तुमची सुरक्षितता लक्षात घेऊन आम्ही तुम्हाला आवाहन करतो की, तुम्ही येऊ नका, असे पत्रकात म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 20 मतदारसंघांत विजापूर येथे 7 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. एकूण 90 जागांपैकी उर्वरित 70 जागांसाठी दुसर्या टप्प्यात 17 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.