तभा वृत्तसेवा
धारणी,
Melghat border : मध्य प्रदेशात निवडणुकीचे वारे जोमात सुरू होताच अवैध हत्यारांचा व्यवसाय पण सुरू झालेला आहे. धारणीच्या सिमेवरील खकणार पोलिस ठाणे (मध्य प्रदेश) जवळच्या पांगरी फाट्यावर पोलिसांनी 12 पिस्तुलींसह आरोपीस पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सर्व पिस्तुल पाचोरी मेड आहे.
धारणी तालुक्याच्या सिमेपासून अवघ्या 20 कि. मी. अंतरावरील मध्य प्रदेशच्या पांगरी फाट्यावर आरोपी अनिल रामदिन यादव (44, रा. लखीराम पूर्वा, उ. प्र.) याला खकणारचे ठाणेदार विनय आर्य यांनी अडवून झडती घेतली. Melghat border त्यावेळी त्याच्याकडे 10 पाचोरी मेड पिस्तुली होत्या. आरोपीच्या सांगण्याप्रमाणे सर्व पिस्तुली पाचोरी येथील दारासिंग सिकलीगरच्या घरातून विकत आणलेल्या होत्या. पोलिस पथकाने दारासिंगच्या घराची झडती घेतली. मागच्या बाजुला आणखी दोन हस्तनिर्मित पिस्तुली जप्त करण्यात आल्या मात्र दारासिंग पळून गेला.
मध्य प्रदेशात निवडणुका सुरू होताच शस्त्रांची मोठी खेप पोलिसांच्या हाती लागल्याने महाराष्ट्राची सीमा भोकरबर्डी, बोरखेडा, इच्छापूर नाक्यावर विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. Melghat border धारणी आणि संग्रामपूर तालुक्याच्या सीमेवरील मध्य प्रदेशच्या पाचोरी गावात शस्त्रे बनविण्याचे कारखाने घराघरात चालतात. मध्य प्रदेशातील पोलिसांनी वेळोवेळी कारवाई केली पण सिकलीगर लोकं हा अवैध व्यवसाय सोडायला तयार नाहीत.
पोलिस अधीक्षक देवेंद्रकुमार पाटीदार यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अनिल सोबत दुसरा फरार आरोपी दारासिंग यांची भेट दिल्ली येथील एका तुरुंगात झालेली होती. Melghat border तेथेच दारासिंगने पिस्तुली विकण्यासाठी पाचोरीत येण्याचे निमंत्रण आरोपीस दिले होते. निवडणुकीच्या वेळी अवैध व्यवसायाविरुद्ध प्रभावी कारवाई करण्यासाठी अतिरिक्त पोलिस अधीक्षक अंतरसिंग, एसडीओपीनिर्भयसिंग अलावा कार्यरत आहेत. पाचोरीच्या प्रत्येक घरात अवैध पिस्तुली तयार करुन देशभर विकल्या जातात, हे विशेष.