चिखली,
MLA Shweta Mahale : गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा विषय आता राज्यात ऐरणीवर आला असून जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मनोज जडांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या दुसर्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाच्या जनभावना तीव्र झाले आहेत. मराठा समाजाच्या या तीव्र भावानेची गांभीर्याने दखल महायुतीच्या सरकारने घ्यावी आणि न्यायालयामध्ये टिकणारे व कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण मराठा समाजाला त्वरित प्रदान करण्याचा ऐतिहासिक निर्णय घ्यावा अशी मागणी आ. श्वेता महाले (MLA Shweta Mahale) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली याबाबतचे पत्र त्यांनी दि. 1 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना सादर केले.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयाला घेऊन मुंबई येथे मंत्रालयात आज सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली यावेळी आ. श्वेताताई महाले (MLA Shweta Mahale) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या मागणीचे पत्र सादर केले. मराठा समाजातील युवक व भावी पिढीच्या भवितव्याशी संबंधित असलेला संवेदनशील विषय म्हणजे मराठा आरक्षण हा होय. जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मनोज तरंगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या दुसर्या टप्प्यात मराठा समाजातील महिला, पुरुष व मराठा बांधवांच्या जनभावनांचा प्रक्षोभ मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळतो आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन मराठा समाजाच्या प्रगतीला अग्रक्रम देऊन महाराष्ट्रातील महायुती सरकारने कायद्याच्या चौकटीत बसणारे व टिकणारे असे आरक्षण मराठा समाजाला त्वरित द्यावे अशी मागणी आ. श्वेता महाले (MLA Shweta Mahale) यांनी या पत्राद्वारे केली आहे.