ग्रामस्थांचा महावितरण कार्यालयात ठिय्या

20 Nov 2023 16:57:09
कारंजा लाड, 
Mahavitaran office कारंजा महावितरण कार्यालया अंतर्गत येत असलेल्या पानविहीर येथे सद्य परिस्थितीत एक डी. पी. कार्यान्वित असून या डी. पी. वरून शेती सिंचनासाठी व गावासाठी वीजपुरवठा केल्या जातो. त्यामुळे गावात कमी दाबाचा वीज पुरवठा होतो. अशा परिस्थितीत महावितरणने या गावात नवीन डी.पी. द्यावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी कारंजा येथील महावितरणच्या कार्यालयात २० नोव्हेंबरला ठिय्या मांडला.
 

dfds54
 
मागील काही दिवसांपासून पाणविहीर येथे कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गावात पाणी येत नसल्याने गावात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. Mahavitaran office त्यामुळे येथील ग्रामस्थ त्रस्त झाले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने नवीन डी.पी. देण्यात यावी अशी मागणी निवेदनातून ग्रामस्थांनी केली आहे. निवेदनावर शाकीर शेख, अनिल डांगे, भारत राऊत, भगवंता राऊत व अक्षय गावंडे यांच्यासह इतरांच्या स्वाक्षर्‍या आहेत.
Powered By Sangraha 9.0