तभा वृत्तसेवा
अमरावती,
Superintendent of Police Vishal Anand नागपूरस्थित नक्षलविरोधी अभियान विशेष कृती गटाचे पोलिस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी यांची अमरावतीचे नवे पोलिस अधीक्षक म्हणून तर शहराचे पोलिस उपायुक्त विक्रम साळी यांची अपर पोलिस अधिक्षक पदी बदली झाली आहे. मावळते जिल्हा पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ यांच्या कार्यकाळाला सप्टेंबरमध्ये दोन वर्ष झाली. बारगळ यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित होतील.
![Superintendent of Police Vishal Anand Superintendent of Police Vishal Anand](https://www.tarunbharat.net/Encyc/2023/11/21/rertrtrt_202311211527372968_H@@IGHT_400_W@@IDTH_600.gif)
राज्याच्या गृह विभागाने 20 नोव्हेंबरला भारतीय पोलिस सेवा व राज्य पोलिस सेवेतील काही वरिष्ठ अधिकार्यांच्या बदलीने होणार्या पदस्थापनेचे आदेश काढले. यात शहर पोलिस उपायुक्त विक्रम साळी यांची अमरावती ग्रामीणमध्ये अपर पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. Superintendent of Police Vishal Anand ग्रामीणचे अपर पोलिस अधीक्षक शशीकांत सातव यांची नागपूर शहर आयुक्तालयत उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. अमरावती शहर पोलिस उपायुक्त म्हणून बदली होऊनही येथे रूजू न झालेले संभाजी कदम यांची बदली पोलीस उपायुक्त पुणे शहर अशी झाली आहे. गणेश शिंदे अपर पोलिस अधीक्षक लोहमार्ग पुणे यांची पोलिस उपायुक्त अमरावती शहर येथे बदली करण्यात आली आहे.