ज्ञानराज माझी योग्यांची माउली !

21 Nov 2023 16:18:53
साहित्य-संस्कृती
- प्रा. दिलीप जोशी
 
sant-dnyandev-namdev संतश्रेष्ठ, महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांना अवघे विश्व माऊली म्हणून संबोधित करते. माउली ही उपाधी कशी मिळाली, याची गोड कथा आहे. काशी क्षेत्रामध्ये विद्वत्सभा भरली होती. sant-dnyandev-namdev एकाहून एक विद्वान या सभेसाठी आले होते. चार वेद, सहा शास्त्र, अठरा पुराणे, पद, क्रम, घन, जटा यांसारखे प्रचंड ज्ञान त्यांच्या जवळ होते. काशी नगरात मुद्गल शास्त्रींच्या आश्रमातील सभागृहात अशी सर्व मंडळी एकत्रित आली होती. sant-dnyandev-namdev सभा सुरू होण्यापूर्वी सभापती म्हणून उच्चासनावर कोण बसेल, यात त्यांचे एकमत होईना. प्रत्येकाला आपआपल्या ज्ञानाचा अहंकार. ज्ञानेश्वरीत सुंदर ओवी आहे. sant-dnyandev-namdev
नवल अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञानापाठी।
परी सज्ञानाचे झोम्बे कंठीं, नाना संकटे नाचवी!
माऊली म्हणतात, किती नवल आहे पहा. ही अहंकाराची गोठी अज्ञानी माणसाच्या पाठीमागे लागत नाही; पण स्वतःला विद्वान समजणाऱ्याच्या कंठी झोंबून, लागून त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते.
 
 
 
sant-dnyandev-namdev
 
 
या विद्वत्सभेतही असेच झाले. प्रत्येक जण स्वतःला उच्चासनाधिकारी म्हणून उच्चासनावर बसण्याचा हट्ट धरीत होता. बराच वेळ चर्चा, वादविवाद, वादसंवाद होऊनही निर्णय लागेना. sant-dnyandev-namdev शेवटी असे ठरले की, काशी नरेशाची राजहत्तिणी आणायची. तिच्या सोंडेत माळ द्यायची. ती ज्याच्या गळ्यात माळ टाकेल तो सभापती म्हणून बसेल. यावर सर्वांचे एकमत झाले. माणसे जेव्हा पशुवत वागायला लागतात तेव्हा न्याय पशूंच्या हातात जातो हेच खरं. सभामंडपात राजहत्तिणीला आणले. तिच्या सोंडेत माळ दिली. सभागृहात दुतर्फा विद्वत्जन रांगा करून उभे राहिले. ती हत्तिणी गजगतीने निघाली. एकेक एकेक विद्वान पार करीत ती सभामंडपातून हमरस्त्यावर आली आणि रस्त्यांवर मार्गक्रमण करू लागली. sant-dnyandev-namdev हत्तिणी पुढे आणि विद्वत्सभा तिच्या मागे. जनांचा प्रवाह निघाला. आता काही जण या प्रक्रियेवर शंका घेऊ लागले. हत्तिणी कुठे विद्वत्शोध घेऊ शकेल का म्हणून कुरबूर करू लागले. पण सभेचा निर्णय तो पाळावाच लागणार म्हणून सर्व लवाजमा हत्तिणीच्या मागे निघाला.
 
 
हत्तिणीच्या समोर राजाचे सैनिक होते. sant-dnyandev-namdev ते पुढून येणाऱ्या लोकांना बाजूला सारून रस्त्याच्या दुतर्फा उभे करीत होते. अशी हळूहळू पायदळ वारी सुरू असताना समोरून काही मंडळी हातात टाळ-चिपळ्या, मृदंगाच्या तालात ‘जय हरी विठ्ठल'चा जयघोष करीत नामसंकीर्तनात तल्लीन अवस्थेत येताना सैनिकांना दिसले. सैनिकांनी धावत जाऊन त्यांना रस्त्याच्या कडेला उभे केले. ती मंडळी निमूटपणे रस्त्याच्या कडेला उभी ठाकली. थोड्या वेळाने राजहत्तिणी आली आणि ती या ईश्वरनिष्ठाच्या मांदियाळीजवळ थांबली. तिने त्यांच्याकडे तोंड फिरवले. sant-dnyandev-namdev त्या घोळक्यात एक राजस सुकुमार मदनाचा पुतळा असलेला दिव्य तेजस्वी कुमार दिसला आणि हत्तिणीने त्या ‘कैवल्याचा पुतळा' असलेल्या तेजस्वी कुमाराच्या गळ्यात माळ टाकली. सर्व जण नाराजी आणि शंका व्यक्त करू लागले. रस्त्यावरचा हा भिक्षेकरू दिसतोय. हत्तिणीने त्याच्या गळ्यात माळ टाकली. हत्तिणीला काय समजते, अशी आगपाखड सुरू झाली. पण ठरल्याप्रमाणे त्या युवकाला सभामंडपात आणले. विद्वत्जनांनी स्थान ग्रहण केले.
 
 
sant-dnyandev-namdev आपसात कुजबूज सुरू झाली. तितक्यात राजगुरूंनी ठरल्याप्रमाणे या तेजस्वी बालकाला उच्च आसनाकडे येण्यासाठी आमंत्रित केले. तो बालक पायरी चढणार तितक्यात एका विद्वत् सभासदाने आवाज दिला...
‘‘थांबा! कोण आहे हा बालक? हा खरंच अधिकारी आहे का उच्चासनाचा? याचा पहिले परिचय द्या.''
बालक उच्चासनाच्या पायरीजवळ उभा आहे. त्याच वेळी या बालकासोबत असलेले आणि बालकापेक्षा वयाने जरा मोठे, कपाळी गोपिचंदन, बुक्का, पायात घुंगरे, हाती वीणा आणि चिपळ्या असा एक सद्भक्त उभा राहिला. sant-dnyandev-namdev तो म्हणाला, ‘‘मी देतो परिचय....'' त्या तेजस्वी बालकाकडे हात दाखवत त्याने परिचयाला सुरुवात केली. ते म्हणाले, कोण आहेत हे? अहो! त्यांच्या तोंडून शब्द जैसे कल्लोळ अमृताचे बाहेर पडू लागले. अत्यंत प्रसिद्ध अभंग त्यांच्या तोंडून बाहेर आला.
ज्ञानराज माझी योग्यांचि माऊली, जेणे निगमवल्लि प्रकट केली।
गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, आणि ब्रह्मानंद लहरी हेलावली!
नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी!
 
 
 
sant-dnyandev-namdev कोण आहेत हे? अहो ही तर आमची माउली! जिने निगमवल्ली प्रकट केली. गीतेवर अलंकार चढवला. समजा एखादी स्त्री आधीच सुंदर आणि तिने दागिने घातले तर ती अधिक आणि विशेष सुंदर दिसेल. श्रीमद् भगवद्गीता आधीच सुंदर, पण माऊलींनी त्यावर अलंकार चढवला. म्हणून तर म्हणतात की, जे गीतेत आहे ते ज्ञानेश्वरीमध्ये आहेच; पण जे ज्ञानेश्वरीत आहे ते गीतेमध्ये नाही. sant-dnyandev-namdev असा प्रकट गुह्य ग्रंथ ज्यांनी लिहिला ती आमची ज्ञानेश्वर माउली! काशीच्या विद्वत्सभेतील तो बालक म्हणजे महावैष्णव संत ज्ञानेश्वर आणि त्यांचा परिचय देणारे ज्यांचा हा प्रसिद्ध अभंग आहे ते संतश्रेष्ठ नामदेव महाराज. तेव्हापासून संत ज्ञानेश्वरांना माउली म्हणून संबोधले जाऊ लागले. संत नामदेव महाराजांनंतर अनेक संतांच्या अभंगात ‘माऊली' उल्लेख आहे. त्यामुळेच ही अवघ्या विश्वाची माऊली!
९८२२२६२७३५
Powered By Sangraha 9.0