हिंगणघाटात रेल्वेस्थानकावर कुलूपबंद शौचालय उघडण्यासाठी पूजा

22 Nov 2023 19:00:14
तभा वृत्तसेवा
हिंगणघाट, 
Hinganghat railway station : हिंगणघाट रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचा सुविधेकरिता उत्तम बांधणीचे असलेले शौचालय नेहमी कुलूपबंद असते. कोरोनानंतर रेल्वे गाड्या सुरू झाल्या. परंतु, शौचालयाचे कुलूप निघाले नसल्याने रेल्वे मित्र परिवाराच्या वतीने कुलूप काढण्याच्या मागणीसाठी आज त्या शौचालयाच्या दरवाजाची पूजा करून अनोखे आंदोलन करण्यात आले.
 
Hinganghat railway station
 
स्थानिक रेल्वेस्थानकावर अनेक प्रवासी गाड्या थांबतात. महिला, शिक्षण घेणारे मुलं मुली, म्हातारे, बालकं रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रवासाकरिता येतात. परंतु, कुणालाही या शौचालयाचा लाभ घेता येत नाही. या सर्वात जास्त त्रास महिलांना होतो. रेल्वे प्लॅटफॉर्मवर पाणी तसेच शौचालय या प्रवाशांच्या मुलभूत गरजा आहेत. परंतु, Hinganghat railway station रेल्वे प्रशासनाला हे कळत नसल्याकारणाने रेल्वे प्लॅटफॉर्मवरील शौचालय कायमस्वरुपी कुलुप बंद असल्याने आज सकाळी मेमू ट्रेनच्या वेळेवर रेल्वस्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर असलेल्या कुलूपबंद शौचालयाचा हळद कुंकू व पुष्प अर्पण करून पूजा करून प्रवासी नागरिकांना या शौचालयाचा लाभ घेता यावा यासाठी रेल्वे प्रशासनाला जाग येण्यासाठी मनोभावे प्रार्थना केली. यावेळी प्रवासी मित्र प्रवीण कडू, अनिल बावणे, प्रवीण मेश्राम, प्रवीण भोयर आदी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0