मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भरधाव कारची टँकरला धडक; दोघांचा मृत्यू

    दिनांक :23-Nov-2023
Total Views |
मुंबई :
Palgharभरधाव कार व टँकरच्या अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर Palghar पालघरमधील मेंढवणजवळ हा भीषण अपघात झाला. भरधाव कार आणि टँकरची धडक इतकी भीषण होती की, कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला.
 
 
Palghar
 
गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. प्राप्त माहितीनुसार, कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार समोरून येणाऱ्या टँकरवर जाऊन आदळली. Palghar अपघातग्रस्त कार मुंबईहून गुजरातकडे जात होती तर टँकर गुजरातहून मुंबईच्या दिशेने येत होता. या अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. पालघर जिल्ह्यातील मेंढवण येथे हा अपघात झाला. दोन वाहनांची धडक इतकी भीषण होती की अपघातात कार अक्षरशः चेंदामेंदा झाली. अपघातानंतर महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली.