ब्रिटिशी जाती व्यवस्था; इसाई मिशनरींची संकल्पना!

    दिनांक :23-Nov-2023
Total Views |
दृष्टिक्षेप
 
 संकेत राव 
British caste system : 1871 मध्ये ब्रिटिश सरकारने कास्ट हा शब्द भारतात खर्‍या अर्थाने वापरणे सुरू केले, तत्पूर्वी ‘कास्ट’सारखा कुठलाही शब्द भारतात नव्हता. फक्त 4 वर्ण होते, यात मात्र काही शंका नाही. भारतीय वर्ण व्यवस्था ही स्थायी स्वरूपाची नव्हती, म्हणजेच इथला शूद्र हा ब्राह्मण सुद्धा होऊ शकत होता. वर्णव्यवस्था ही अस्थायी स्वरूपाची होती. मात्र स्वतःचा स्वार्थ बघून बि‘टिश सरकारने या व्यवस्थेला स्थूल केले. म्हणजेच शूद्र हा नेहमी शुद्रच राहील आणि ब्राह्मण हा नेहमी ब्राह्मणच. याच निर्णयापासून भारतात खर्‍या अर्थाने जातीव्यवस्था मूळ रूप घेऊन विकसित होत गेली, सामाजिक एकात्मता खंडित करीत गेली, आणि आज सुद्धा करीत आहे. British caste system या समृद्ध, बलशाली, साक्षर समाजावर जातीवाद नावाचा हा फास कसा काय अडकवला गेला असेल? याचे उत्तर विशेष संदर्भातून सुद्धा घ्यायची गरज नाही. तुम्ही सोपे उदाहरण घेऊ शकता. जेव्हा आपली आर्थिक, सामाजिक आणि शारिरीक समृद्धी होते, तेव्हाच आपण अध्यात्मात किंवा साहित्यात विशेष प्रगती करू शकतो.
 
British caste system
 
मग खरंच या देशात पूर्वीपासूनच टोकाचा वर्णभेद किंवा जातीवाद असता तर आपल्या भारतीय संस्कृतीची एवढी प्रचंड प्रगती झाली असती का? आपल्याला वेद, उपनिषद, रामायण, महाभारत, अद्वैत, पतंजली योग सूत्र, लीलावती, गीता, अष्टावक्र गीता, महासिद्धांत, महशतिका, आगम सूत्र, त्रिपटीका तसेच भागवतासारखे महाकाव्य, सिद्धांत मिळाले असते का? वैज्ञानिक शोध, गणितीय शास्त्राचे, खगोलीय शास्त्राचे, ज्योतिष शास्त्राचे शोध लावता आले असते का? जर खरंच आपल्या देशात पूर्वीपासूनच अराजकता आणि टोकाची जातीवादी वृत्ती असती तर जगाला वसुधैव कुटुम्बकम्ची शिकवण आपण देऊ शकलो असतो का? जैन आणि बौद्ध संप्रदायांचा देश विदेशात विस्तार झाला असता का ?
 
 
एवढेच नव्हे तर भारतीय स्थापत्यकलेचा विकास झाला असता का? खजुराहो, मीनाक्षी मंदिरांसारखी स्थापत्याचा उत्तम नमुना असलेली मंदिरे निर्माण झाली असती का ? त्या काळात भारत संपूर्ण जगाच्या 33 टक्के जीडीपी असणारा एकमेक British caste system आर्थिकदृष्ट्या सक्षम देश होता, मग खरंच जर देशात जातीय दंगली, वर्णभेद, अराजकता असती तर एवढे वैभव शक्य झाले असते का? मुळीच नाही! म्हणजेच यावरून लक्षात येऊ शकते की जातीवाद ही कीड मध्यकालीन इतिहासात बाहेरून आलेल्या दृष्ट शक्तींनी लावली आहे. त्यात एकच सैतानी शक्ती नव्हती तर चार महत्त्वाच्या सत्ता होत्या. त्या आहेत पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच आणि इस्लामी आक‘मक.
 
 
इस्लामी आक्रमक सर्वात अपयशी जर कुठे झाले असतील, तर एकमेव हिंदुस्तानातच ! भारताच्या एकात्मतेला तडे देण्याच्या नादात जिहादी वृत्तींनाच स्वतःचे 4 तुकड्यांमध्ये विभाजन झालेले बघावे लागले. आणि मग त्यांनी मंदिर, मठ, धर्म आणि धर्माच्या आधारावर असलेल्या कर्म आधारित वर्णव्यवस्थेवर घाव घातला. पुढे याच सैतानांचे उर्वरित कार्य समुद्री मार्गाने येणार्‍या इसाई मिशनरी समूहाने पुढे नेले. इसाई मिशनरी लोकांना सुद्धा आपला धर्म पसरविण्यासाठी फार यश मिळत नव्हते, म्हणूनच त्यांनी समाजात विविध प्रकारे प्रादेशिक, लैंगिक, सामाजिक आणि धार्मिक फूट पडायला सुरुवात केली. सर्वात जास्त भर दिला गेला सामाजिक फूट पाडण्यावर.
 
 
पूर्वी स्त्री आणि पुरुष हे दोन्ही सोबत गृहस्थ जीवन जगून परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी तप-साधना करीत असत. समाजाला आपण काय देऊ शकतो, याचे चिंतन करीत असत. British caste system त्यांच्यामध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेदसुद्धा नव्हता. ते दोघे अर्धनारी नटेश्वराचे साधक होते. मग स्त्री-पुरुष श्रेष्ठ आणि कनिष्ठ असा भेद कोणी निर्माण केला ? याची खरी सुरुवात केली गेली 13 व्या शतकामधे पश्चिमेकडून आलेल्या खलाशांकडून. कारण त्यांच्या धर्मात तर स्त्रियांना अनेक दशके निर्जीवच समजल्या जात असे. परंतु जेव्हा भारतातील स्त्री-पुरुष त्यांनी बघितले, तेव्हा त्यांना येथील परिस्थिती कळू लागली. भारतीय पुरुष स्त्रियांना जगदंबा म्हणून पूजतात हे चित्र त्यांना कुठेतरी दिसले. त्यांच्या मनाला हे पटले नाही. त्यांनी स्त्री-पुरूष भेद आणि स्त्री सबलीकरणासारखे खोटे मुखवटे घालून समाजात भेद निर्माण करणे सुरू केले. इसाई धर्मात हिंदू स्त्रियांना प्रवेश देऊन, त्यांच्यासोबत विवाह करून आपले सं‘याबळ वाढविले.
 
 
हिंदू पुरुष हे हिंदू स्त्रियांचे शोषण करतात, असा मानस समाजात आणि स्त्रियांमध्ये विशेषत रुजवला गेला आणि स्त्रियांचे मोठ्या प्रमाणात धर्मांतरण केल्या गेले, असे अनेक पुरावे आपल्याला गोवा राज्यातील पोर्तुगीज इतिहासात मिळतील. त्या काळापासूनच हा खोटा आणि निरर्थक स्त्री-पुरुषांच्यातील भेद सुरू झाला. British caste system आजचा ‘स्युडो फेमिनीसम’ हा त्यातलाच एक प्रकार आहे. भारतीय नारी नेहमीच सबला होती. ती साक्षात जगदंबा आहे. मग स्त्री अधम असा भेद का निर्माण केला गेला असावा?... उत्तर एकच... फक्त धर्मप्रसार आणि भारतीय समाजाचे विभाजन प्रत्येक स्तरावर करणे. असेच नंतरच्या काळात उत्तर भारतीय - दक्षिण भारतीय भेद सुरू झाला. पुढे काही दशकातच सवर्ण-अवर्ण भेद सुरू झाला. त्यानंतर या सर्व भेदांचे स्वरूप जातिवादाने घेतले.
 
जातिव्यवस्थेची सुरुवात आणि सामाजिक एकात्मतेचे पतन
जातिव्यवस्था किंवा वर्णव्यवस्था समजावून घेण्याअगोदर लोकाचार आणि शास्त्राचार आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. वरील दोन्ही आचार हे समाजासाठी एका नियमावलीसारखे कार्य करीत असत. उदाहरणार्थ मनुस्मृती, पराशर इत्यादी संहिता शास्त्राचार म्हणून ओळखल्या जात असत. यात 11-12 प्रकारचे ग्रंथ येतात. British caste system महत्त्वाचे म्हणजे याचे लिखाण ब्राह्मण करीत नसत. विषयात पारंगत व्यक्ती त्या त्या विषयाचे लिखाण करून समाजासमोर ठेवत असे. मात्र त्या सर्व ग्रंथाची जपणूक करणे, त्यांचा योग्य सांभाळ करणे, हे कार्य ब्राह्मणांकडे समाजाने सोपवले होते. मग आता प्रश्न लोकाचाराचा... महाभारतातले एक उदाहरण आपल्याला माहिती असेल... द्रौपदीने पाच पांडवांशी विवाह केला. द्रौपदी 5 पांडवांशी विवाह करू शकते, असा नियम कुठेच शास्त्रात नव्हता. कारण भारतीय संस्कृतीत एक विवाह पद्धती होती. परंतु भारत एवढा विशाल देश, त्यात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळे लोकाचार असत. मग हा नियम होता लोकाचारात आणि त्याचे पालन करून तसा विवाह सुद्धा पांडवांचा द्रौपदी सोबत झाला. आजही हिमाचल प्रदेशमधील काही गावात ही परंपरा अगदी नियमाने पाळली जाते.
 
 
त्यामुळे कुठल्याही स्मृती किंवा शास्त्रात असलेले नियम हे बळजबरीने लादलेले नव्हते. तसेच ते सर्व नियम आणि स्मृतिवचने सर्वोपरी सुद्धा नव्हती. हिंदू समाज हा एकपुस्तकी नव्हता. अनेक पुराण आणि शास्त्रांचे अभ्यासक आपण होतो. म्हणूनच आद्य शंकराचार्य सुद्धा अद्वैत सिद्धांत काश्मीरचे शासक असलेल्या कश्यप ऋषींच्या साहित्यातून जाणून घेतात. भरत मुनी सारखे ऋषी ब्राह्मण नव्हते पण त्यांनी समाजाला नाट्य शास्त्र दिले. म्हणजेच त्या काळात सुद्धा वर्णव्यवस्था ही कर्मावरच आधारित होती... आणि कर्माचा विचार केला, तर भरत मुनी शतप्रतिशत ब्राह्मणच होते.
 
 
नारद मुनी आपल्या सर्वांना माहिती आहेत, आपण त्यांना ब्रम्हा पुत्र म्हणून ओळखतो. British caste system परंतु नारद हा शब्द खर्‍या अर्थाने वनात राहणार्‍या आपल्या वनवासी हिंदूंच्या पुराणात सुरुवातीला आढळतो. आपले दक्षिण भारतातले वनवासी बंधु नारदाला ऋषिराज म्हणून पूजतात तर काही ठिकाणी नारद हा शब्द वनवासी लोकांचे रक्षण करणारा पर्वत राज या अर्थानेसुद्धा आलेला आहे. (ब‘म्हावैवर्ता पुराण). अशीच एकात्मता प्रत्येक वर्णात आणि समाजाच्या प्रत्येक स्तरावर भारतात होती. म्हणूनच तर एक नाव चालविणार्‍याची मुलगी सत्यवती, चक्रवर्ती सम्राट असलेल्या राजा शांतनू सोबत अगदी सहज विवाह करू शकते. आज पासून 6000 वर्षांपूर्वी असा काळ होता. मग विचार करण्याची बाब म्हणजे जातीवाद सुरुवातीला होता की आज मोठ्या प्रमाणात आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. आजची परिस्थिती अगदी विपरीत आहे. आज एका जातीची व्यक्ती आपली मुलगी स्वतःच्या पोटजातीत सुद्धा द्यायला खूपदा विचार करते. ही मानसिक गुलामी आहे, याचा पूर्ण फायदा इसाई मिशनरी पुरेपूर घेत आले आहेत. आपली वर्णव्यवस्था ही काय पक्की व्यवस्था नव्हती आणि या वर्ण व्यवस्थेमध्ये अस्पृश्यता मुळी नव्हतीच.
 
 
एक इस्लामिक प्रवासी इबना बतुता याने एक रिहाला नावाचे पुस्तक भारत दौर्‍यावर असताना लिहिले. त्यामध्ये तो वर्णन करतो की, असंख्य गावात आणि समाजात विशेष स्थान आणि सन्मान प्राप्त असलेले अनेक भारतीय हिंदू स्वतःचा आणि परिवाराचा जीव इस्लामिक आक‘मकांपासून वाचविण्यासाठी जंगलात स्थायिक झाले आणि पुढे ते जंगलातील परिस्थितीला अनुसरून निवास करू लागले. कालांतराने British caste system ब्रिटिश सरकारने याच हिंदू समाजाला शेड्युल्ड ट्राईब म्हणून घोषित केले. त्यांच्या मनात तुम्ही शोषित वर्ग आहात, असे रुजवण्यात आले. तुमच्यावर उच्च जातींनी अत्याचार केलेत, असा मानस त्या काळात तयार केला आणि तो आजतागत सुरू आहे. आज आपल्या समाजाला सांगावे लागेल... वनात गेलेले ते आपले बंधू इस्लामी अत्याचार सहन करून, स्वतःचा धर्म आणि परिवाराचे रक्षण करण्यास यशस्वी झाले. आपले ते सर्व बंधू योद्धे आहेत, त्यांचे ऋण आपल्यावर आहे. त्यांनी खरी संस्कृती जपून ठेवली आहे. त्यांचे सदैव आभार आपल्या मनात कायम असावे.
 
 
मूळ वनवासी लोकसुद्धा समाजातील प्रत्येक वर्गाशी मिळून मिसळून राहत होते. याची अनेक उदाहरणे आपल्या इतिहासात आहेतच. श्रीराम आणि केवटाचे उदाहरण आपण लक्षात घेऊ शकता, सुग्रीव आणि श्रीराम यांच्या मैत्रीचे उदाहरण आपण लक्षात घेऊ शकता. मात्र ह्या मूळ वनवासी हिंदूंना समाजाच्या मु‘य प्रवाहातून दूर करून त्यांना इसाई बनविण्याचे कार्य British caste system ब्रिटिशांनी केले आणि असेच काही अनुसूचित जातींसाठी आणि इतर मागासवर्गीयांसाठी सुद्धा केले गेले. उच्च जातीचा उपयोग घेऊन बि‘टिशांनी दलित असणार्‍या आपल्या बंधूंवर अत्याचार केले. यामागे मोठे षडयंत्र होते. पुढे स्वतंत्र भारतात अशाच मार्क्सवादी, फुटीरवादी इतिहासकारांना आपल्या देशाचा इतिहास लिहिण्याचे कार्य मिळाले. त्यांनी त्यात अजूनच जातिव्यवस्था आणि वर्णभेद स्थूल करून समाज तोडण्याचे कार्य केले. तुम्ही उच्च वर्गापासून शोषित झालेला आहात, अशी जाणीव सतत भारताच्या एकात्म समाजाला देण्याचे कार्य डाव्या विचारसरणीच्या इतिहासकारांनी केले.
 
 
एकंदरीत संपूर्ण समाजाचे आचरण अभ्यासून इसाई पादरींनी जातीव्यवस्था उदयास आणून तिला समाजात एकरूप करण्याऐवजी तिला उच्च आणि नीच... शोषित आणि शोषण करणारे या दोन भागात विभागून आपल्याला देशाला जाती नावाची कीड लावून दिली. आज सुद्धा एवढे शिक्षण घेऊन, बुद्धीचा विकास करून सुद्धा या मार्क्सवादी विचारांचा नाश आपला समाज करू शकलेला नाही, उलट ही जातिव्यवस्था, दलित, वंचित, मागासलेले, आदिवासी असे शब्द पेरून समाजाच्या एकात्मतेला सतत घाव देत आहेत.
 
 
सर्व भारतीय समाज एक आहे... आपण सर्व बंधु आहोत. जर समाजात एकही वर्ग स्वतःला दलित समजत असेल तर पूर्ण समाज दलित आहे, जर समाजातील एकही वर्ग स्वतःला वंचित समजत असेल तर संपूर्ण समाजच वंचित आहे. स्वतःच जातीवाद संपविण्यासाठी निघालेले पुरोगामी, जातीवाद नष्ट करण्यासाठी काहीही प्रयत्न करीत नाहीत. British caste system अनेक पुरोगामी डंके के चोट पर जातीव्यवस्था आणि त्याबद्दल अनेक आक्षेप उपस्थित करीत असतात. स्वतःला पुरोगामी म्हणायचे आणि जातीवादाचे समर्थन करून आपल्या मतपेट्यांची काळजी करायची... हा कुठला पुरोगामीपणा ?
 
 
आज भारत मातेचे आपण सर्व पुत्र आहोत हा भाव मनात जागृत करून संघटित भारतीचे पुत्र म्हणून जगण्याची गरज आहे. British caste system सामाजिक समरसता आणि आत्मीय बंधुताच आपल्या भारतीय समाजाला पुनः त्या वैभवाच्या स्थानावर विराजमान करू शकतो. ‘जी जात नाही, ती जात’ असे वाक्य समाजात रुजवून या व्यवस्थेला प्रोत्साहित करण्यापेक्षा जातीला आपल्या मनातून, समाजातून चालते करावे. नाहीतर उद्याचा दिवस जातीचा असेल आणि आपल्यालाच आपल्या स्वाधर्मातून जावे लागेल. !
 
 
हिन्दव: सोदरा: सर्वे, न हिन्दू पतितो भवेत्।
मम दीक्षा हिन्दू: रक्षा,मम मंत्र: समानता॥
 
- 7038890723