मुंबई,
Karishma Tanna देशभरात फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. 10 पैकी 8 लोक दररोज कोणत्या ना कोणत्या फसवणुकीचे बळी ठरतात. आता असेच काहीसे एका प्रसिद्ध जोडप्यासोबत आणि अभिनेत्यासोबत घडले आहे. अभिनेता समीर कोचरचा, अभिनेत्री करिश्मा तन्ना आणि पती वरुण बंगेरा यांच्यासोबत फसवणुकीचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात समीर आणि वरुणचे अनेक कोटींचे नुकसान झाले आहे.
करिश्मा तन्ना, वरुण बंगेरा आणि समीर कोचर यांनी रिअल इस्टेट डेव्हलपमेंट फर्मचे मालक असलेल्या आणि चालवणार्या जोडप्याविरुद्ध 1.3 कोटी रुपयांचा फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. वांद्रे येथील फ्लॅट विकण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप या दाम्पत्यावर करण्यात आला आहे. Karishma Tanna या प्रकरणात, पोलिसांनी सांगितले की, आरोपी प्रनीत प्रेम नाथ आणि त्याची पत्नी अमिषा यांच्यावर तक्रारदाराच्या कुटुंबाची 2022 मध्ये वांद्रे येथील फ्लॅट विकण्याच्या नावाखाली 1.03 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. मुंबईच्या अंधेरी पोलिसांनी आरोपी पती-पत्नीविरुद्ध भादंवि कलम ४०९ आणि ४२० अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
कोचर आणि करिश्मा तन्ना यांचे पती वरुण बंगेरा यांनी 2020 मध्ये लग्न केल्यानंतर प्रणित नाथ आणि त्यांची पत्नी अमिषा यांच्याकडून वांद्रे पश्चिम येथील पाली भागात दोन फ्लॅट खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता, ज्यासाठी समीर कोचर यांनी 1 कोटी 95 लाख रुपये आणि वरुणने 1 कोटी 95 लाख रुपये दिले होते. बंगेरा यांनी ९० लाख रुपयेही दिले होते. या वर्षी जूनमध्ये आरोपींनी फ्लॅट विकण्याची इच्छा नसल्याचे सांगितले, मात्र फ्लॅट आधीच विकल्याचे समोर आले.