अग्रलेख
rahul-kharge-congress निव्वळ नाईलाजास्तव काँग्रेसने नेतेपदावर बसविलेले राहुल गांधी यांची राजकीय समज प्रगल्भ होण्याकरिता आणखी किती काळ जावा लागेल, याचे उत्तर आजच्या राजकारणातील कोणत्याही धुरंधरास देता येणारच नाही, अशी स्थिती आता विकोपास गेली आहे. rahul-kharge-congress राहुल गांधी जेव्हा देशात भारत जोडो या संदेशाचा मुखवटा पांघरून भाजपविरोधी विद्वेषाचे बीज पेरत देशात पदभ्रमण यात्रा करत होते, त्या काळातील त्यांच्या साक्षात गैरहजेरीचा फायदा घेऊन काँग्रेसने मल्लिकार्जुन खडगे यांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बसविल्यानंतर काँग्रेसवरील गांधी घराण्याचा व पर्यायाने राहुल गांधींच्या अपरिपक्व राजकारणाचा वरचष्मा कमी होईल, असे आडाखे बांधले जात होते. rahul-kharge-congress याच काळात काँग्रेसमधील असंतुष्टांनी राहुल गांधींच्या नेतृत्वगुणांवर प्रश्नचिन्हे उमटवून त्यांच्या नेतृत्वास जाहीर आव्हानेही दिली होती. गुलाम नबी आझाद यांच्यासारख्या नेहरू परिवारनिष्ठ नेत्याने तर काँग्रेसला सोडचिठ्ठी देताना गांधी परिवारावर टीका केली होतीच; पण अन्य अनेक नाराज नेत्यांचा एक गट काँग्रेसमधील राहुल गांधींच्या वर्चस्ववादावर टीका करत पक्षासमोर प्रश्नांची मालिकाच उभी करीत होता. rahul-kharge-congress
त्यामुळे राहुल गांधी यांच्यासमोर दोन पर्याय उरले असावेत, असा तर्क तेव्हाच्या राजकीय वर्तुळात वर्तविला जात होता. पहिला म्हणजे, राहुल गांधींना पक्षावरील वर्चस्वाची पकड सैल केली पाहिजे किंवा आपल्या नेतृत्वगुणांची प्रगल्भता एका राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यास सुसंगत वाटेल एवढ्या पातळीपर्यंत वाढविली पाहिजे. rahul-kharge-congress राहुल गांधी यापैकी कोणताही एक पर्याय स्वतःहून स्वीकारतील आणि पक्षाची घसरण थांबवून पक्षाला प्रगल्भ नेतृत्व देतील, असा अंदाज त्या वेळी वर्तविला जात होता; पण प्रत्यक्षात अशी अपेक्षा करणाऱ्यांच्या पदरी निराशाच आली. राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष किंवा महत्त्वाचे पदाधिकारी नाहीत. लौकिकार्थाने मल्लिकार्जुन खडगे हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यामुळे पक्षातील धोरणात्मक बाबींवरील त्यांचा शब्द अधिकृत आणि अंतिम असावा असे संकेत असले, तरी राहुल गांधींनी बोलावे आणि खडगे यांनी राहुल गांधींच्या कोणत्याही विधानाचे तोकडे, लंगडे किंवा कसेही समर्थन करत मान हलवावी, एवढेच काम त्यांना करावे लागत आहे.rahul-kharge-congress २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतरच्या काँग्रेसच्या वाताहतीची जबाबदारी कोणाची? याचे उत्तर पक्षातील सर्वांस माहीत आहे. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतही राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने काय कमाई केली, हे लपून राहिलेले नाही.
आता २०२४ च्या लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना पुन्हा एकदा नव्या डोकेदुखीचे निमित्त काँग्रेससमोर येणार, असे दिसू लागले आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारानिमित्त राहुल गांधींचे दौरे सुरू आहेत आणि प्रत्येक दौèयात राहुल गांधींच्या काही ना काही वक्तव्यांनी काँग्रेस अडचणीत येताना दिसत आहे. rahul-kharge-congress अगदी अलीकडे, महादेव नावाच्या ऑनलाईन सट्टेबाजीच्या लाच प्रकरणावरून वादग्रस्त ठरलेले छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या उपस्थितीत राहुल गांधी यांनी बघेल यांच्यावरच हल्ला चढविला तेव्हाही काँग्रेसची पंचाईत झालीच होती. नरेंद्र मोदी हे केवळ भाजपचे नेते नाहीत. ते देशाचे पंतप्रधान आहेत आणि पंतप्रधानांवर टीका करताना राजकीय नेत्यांनी सभ्यतेची किमान पातळी राखावयास हवी, असे संकेत आहेत. राहुल गांधी आपल्या कोणत्याही भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बेफाम टीका करताना हे संकेत पायदळी तुडवितात, हे वारंवार दिसून आलेले आहे. rahul-kharge-congress चौकीदार चोर है, सगळे मोदी चोर कसे असतात, येथपासून सुरू झालेल्या राहुल गांधींच्या अपरिपक्व राजकीय टीकेची सुरुवात काँग्रेसने फार पूर्वी केलेल्या द्वेषाच्या बीजांतून उगवली आहे, हे देशाला आता ठावुक झालेले आहे.
नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना काँग्रेसने त्यांच्यावर सूडबुद्धीने केलेल्या अमानुष कारवायांना अत्यंत संयमाने तोंड देत स्वतःस निष्कलंक शाबित केल्यानंतरच मोदी यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला आहे. तरीही, देशाची दिशाभूल करण्याकरिता मोदी यांच्या प्रतिमेवर चिखलफेक करण्याचा काँग्रेसचा नीतिहीन प्रचार सातत्याने सुरू राहिला आणि त्याचीच री ओढताना राहुल गांधी अनेकदा स्वपक्षास कसे अडचणीत आणतात, हेच बघेल यांच्या उपस्थितीतील त्या प्रचार सभेत दिसून आले होते. rahul-kharge-congress मोदी आणि अदानी यांच्यावरील टीकेव्यतिरिक्त राहुल गांधींच्या भाषणाला कोणताही पाया नसतो. छत्तीसगढमधील त्या सभेतही, मोदी-अदानींवरील टीकेच्या ओघात त्यांनी स्वपक्षाचे मुख्यमंत्री असलेल्या भूपेश बघेल यांनाच अदानींचा हस्तक ठरवून टाकले, तेव्हा भूपेश बघेल यांचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. मोदी यांची लोकप्रियता आणि त्यांची प्रतिमा हेच त्यांचे भांडवल आहे, त्यामुळे मोदींचे प्रतिमाहनन करणे हाच आपला कार्यक्रम राहील, असे राहुल गांधींनी काही वर्षांपूर्वी जाहीर केले होते. rahul-kharge-congress असा एक कलमी कार्यक्रम घेऊन कोणताही पक्ष स्वत:ची किंवा आपल्या नेत्याची प्रतिमा उंचावू शकत नाही. तरीही काँग्रेसने राहुल गांधींच्या या धोरणाची री ओढण्याचे ठरविले असावे.
त्यामुळे राहुल गांधींनी मोदी यांच्यावर टीका करताना जीभ घसरू द्यावी, नैतिकतेचे संकेत खुंटीवर टांगावेत आणि गांधीनिष्ठ काँग्रेसींनी त्याला लोंबकळत आपली फरफट करून घ्यावी, हे ठरलेलेच आहे. आताही राहुल गांधींच्या ताज्या वक्तव्यानंतर काँग्रेसला त्याचाच अनुभव येणार आहे. मोदी हे पंतप्रधान, म्हणजे, पीएम (प्राईम मिनिस्टर) आहेत, याचे राहुल गांधींना भान राहिले नाही आणि राजस्थानातील एका प्रचार सभेत बोलताना, मोदींच्या चारित्र्यहनन मोहिमेच्या पातळीतील सर्वांत खालची पायरी उतरून राहुल गांधींनी पीएम म्हणजे ‘पनौती मोदी' असा उल्लेख केला. rahul-kharge-congress काँग्रेसच्या प्रचारनीतीतील हा सर्वात हीन दर्जाचा कमरेखालचा वार म्हणावा लागेल. महाराष्ट्रात अलिकडे अशा प्रकारच्या हीन पातळीच्या आरोप-प्रत्यारोपांची राळ उठलेली आहे. उद्धव ठाकरे यांचे समर्थक व त्यांच्या गटाचे प्रवक्ते संजय राऊत हे याचे जनक मानले जातात. कमरेखालची टीका करण्यात आपला हात कोणी धरू शकत नाही, अशी ख्याती मिळविण्याचा चंग बांधला असावा, अशा जोशात राऊत यांची सकाळ उजाडते, असे म्हटले जाते. rahul-kharge-congress पण राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान मोदी यांच्यावरच पनवती मोदी अशी टीका करून राऊत यांच्या मक्तेदारीस आव्हान दिले आहे. गेल्या काही वर्षांपासून राऊत यांनी आपल्या वक्तव्यांतून आपल्या परिपक्वतेची क्षमता सिद्ध केली असल्याने, त्यांच्या नेतृत्वाचे गांभीर्य संपलेले आहे.
तसेही, राऊत यांनी मतदारांस सामोरे जाऊन त्यांची मान्यता मिळविलेली नाही. उद्धव ठाकरे यांचे प्रवक्ते म्हणून त्यांची राज्यसभेवर वर्णी लागली असली, तरी त्यांच्या लोकप्रियतेची नेमकी कसोटी कधीच सिद्ध झालेली नाही. राहुल गांधी यांचे तसे नाही. ते एका राष्ट्रीय पक्षाचे नेते आहेत. rahul-kharge-congress त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कृतीची, उक्तीची आणि आचरणाची तुलना साहजिकच त्यांच्या घराण्यातील पूर्वसुरींसोबत होत असते. त्यामुळे त्यांच्यावरील राजकीय जबाबदारीचे ओझे राऊत यांच्यापेक्षा कितीतरी मोठे आहे. अशा परिस्थितीत, राहुल गांधी यांनी स्वत:चा राऊत होऊ न देणे हे त्यांच्या राजकीय भविष्याकरिता आणि काँग्रेसच्या भवितव्याकरिता खूपच महत्त्वाचे आहे. पंतप्रधान मोदी हे पनवती आहेत, हे राहुल गांधींचे म्हणणे एका अर्थाने खरेदेखील आहे. मोदी यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केल्यापासून काँग्रेसला सर्वत्र पराभव पाहावा लागत आहे. मोदींच्या प्रतिमाहननाचे सारे प्रयत्न बूमरँगप्रमाणे उलटत आहेत आणि प्रत्येक प्रयत्नानिशी काँग्रेसलाच त्याचे फटके सोसावे लागत आहेत. rahul-kharge-congress अशा परिस्थितीत मोदी हे पनवती भासणे साहजिक असले, तरी त्याचा उच्चार करून आपली समज किती आहे, याचे जाहीर प्रदर्शन करणे गैरच ठरते. राहुल गांधींच्या वक्तव्याचे समर्थन करताना काँग्रेसच्या प्रत्येकाच्या मनात हीच सल बोचत असेल, यात शंका नाही.