वाशीम,
Washim District वाशीम जिल्ह्यातील एस. टी. महामंडळाचे चार आगार असून, सहा तालुके आहेत. या चार आगारात फक्त १४२ बसेस उपलब्ध आहेत. गेल्या १५ वर्षापासून चारही आगारात नवीन बसेस मिळाल्या नाहीत. बसच्या तुटवड्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी ६० नवीन एसटी. बस उपलब्ध करुन द्याव्या, अशी मागणी खासदार भावना गवळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे.
![Washim District Washim District](https://www.tarunbharat.net/Encyc/2023/11/24/rertrty_202311241526024020_H@@IGHT_400_W@@IDTH_600.gif)
वाशीम जिल्हा आकांक्षित असून, दळवळणाच्या सुविधा अपूर्ण प्रमाणात आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. जिल्ह्यात एस. टी. महामंडळाचे वाशीम, मंगरुळनाथ, कारंजा व रिसोड असे एकूण ४ आगार असून, या आगारातून ६ तालुयासह इतरत्र भागात बसफेर्या सुरू असतात. Washim District सध्या वाशीम आगारात ४२, कारंजा ३०, रिसोड ३८ व मंगरुळनाथ आगारात फक्त ३२ बसेस आहेत. मात्र, या कार्यरत असलेल्या एस. टी. बसेसचीही अवस्था दयनीय आहे. काही बसेस नादुरुस्त अवस्थेत आहे. चांगल्या अवस्थेत असलेल्या काही बसेस मानव विकास मिशन योजने अंतर्गत विद्यार्थ्यासाठी सोडण्यात येतात. परिणामी बसफेर्या बंद असून, सुरू असलेल्या बसफेर्या मधून क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना त्रास सहन करीत प्रवास करावा लागत आहे.
एस. टी. बसेसच्या कमतरतेमुळे ग्रामीण भागातील अनेक बसफेर्या बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना नाईलास्तव खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागत आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी वाशीम जिल्ह्यातील वाशीम आगार २०, मंगरुळनाथ आगार २०, कारंजा १०, रिसोड १० अशा एकूण ६० नवीन एस. टी. बसेस उपलब्ध करुन देण्यात याव्या, अशी मागणी खा. भावना गवळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.