बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सीईओची आत्महत्या

    दिनांक :25-Nov-2023
Total Views |
बेळगाव, 
Belgaum Cantonment Board बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) के. आनंद यांनी शासकीय निवासस्थानी आत्महत्या केली आहे. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. यामुळे कॅम्प परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंंदाज आहे. मागील आठ दिवसांपासून कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कर्मचारी भरतीत झालेल्या घोटाळ्याची चौकशी बंगळुरू आणि दिल्ली येथून आलेले सीबीआय अधिकारी कीरत होते. के. आनंद यांच्यासोबत कॅन्टोन्मेंट बोर्डातील इतर अधिका-यांचीही सीबीआय अधिकारी कसून चौकशी करीत आहेत.
 
 
sev
 
मागील दोन दिवसांपासून आनंद आपल्या शासकीय निवासस्थानात होते. Belgaum Cantonment Board त्यांच्या घरात काम करणाèया कर्मचाèयाने दोन दिवसांपासून दरवाजा उघडला नाही आणि दुर्गंधी येत असल्याचे शनिवारी सकाळी कॅम्प पोलिसांना कळवले. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता आनंद मृतावस्थेत आढळले. के. आनंद हे मूळचे चेन्नई येथील असून, ते २०१५ च्या डिफेन्स इस्टेट सव्र्हिसच्या बॅचचे तरुण अधिकारी होते. ते अविवाहित होते. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नोकर भरतीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यांची दखल सीबीआयने घेतली असून, आनंद यांच्यासह वरिष्ठ अधिकाèयांची चौकशी सुरू केली होती.