पांढरकवडा पोलिसांनी पकडला लाखोंचा जुगार

    दिनांक :25-Nov-2023
Total Views |
पांढरकवडा, 
पाटणबोरीजवळील आरटीओ चेक पोस्ट पिंपळखुटीजवळ असलेल्या सम्राट हॉटेलच्या पाठीमागील हॉलमध्ये पांढरकवडा पोलिसांनी छापा टाकला. या धाडीदरम्यान सुमारे 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. येथील गोलू राय हा त्याच्या नोकराच्या मदतीने वरळी Mataka Jugar मटका जुगाराच्या आकड्यांवर पैशांची बाजी लावून जुगार खेळवीत होता. या ठिकाणी हॉलमध्ये पाच इसम लोकांकडून पैसे घेऊन वरळी मटक्याचे आकडे लिहून त्यांना चिठ्ठी देतांना सापडले. तर काही इसम तेथून पसार झाले. यावेळी पोलिसांनी जुगार खेळणारे व अड्डा चालवणारे अजय गणपत सलाम, श्रीनिवास किष्टन्ना परशावार, रवी मधुकर नंदनकर, सुनील परलेवार, गजानन चिंचोळकर, अक्षय चांदीकर, विलास क्षीरसागर, सत्येंद्र हलवले, संजय दहीकाबले यांना अटक करण्यात आली.
 
 
Mataka Jugar
 
Mataka Jugar : त्यांच्याकडून 53,880 रुपये नगदी, 9 मोबाईल व 2 मोटर सायकल तसेच 2 चारचाकी मोटारी असा एकूण 9,69,380 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी वरळी मटकाचालक गोलू अशोक परसोया (राय) याच्याविरुद्ध मजुका कलम 4, 5 सहकलम 109 भादंवि अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ही कामगिरी पोलिस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर अधीक्षक पीयूष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वेंजने, ठाणेदार अमोल माळवे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक योगेश रंधे, उपनिरीक्षक नितीन सुशीर, उपनिरीक्षक मनोज उघडे, वसंत चव्हाण, प्रमोद जुनुनकर, सतीश बारसागडे, राजू बेलयवार, राजू मुत्यालवार यांनी पार पाडली.