‘विद्यापीठ विकासासाठी एक तास’ स्तुत्य उपक्रम

25 Nov 2023 20:36:29
तभा वृत्तसेवा
 
चंद्रपूर, 
 
gondwana-chandrapur गोंडवाना विद्यापीठातील यंदाच्या अधिसभेत ‘विद्यापीठ विकासासाठी एक तास’ या अभिनव आणि अत्यावश्यक असलेल्या विषयावर प्रदीर्घ चर्चा करण्याात आली. या चर्चेत सभागृहातील बहुतांश सिनेट सदस्यांनी भाग घेतला आणि अत्यंत महत्त्वपूर्ण आणि भविष्याचा वेध घेणार्‍या सूचना सादर केल्या. gondwana-chandrapur या सुचनांच्या आधारे येणार्‍या काळात विद्यापीठाची दिशा ठरेल, अशी आशा पल्लवित झाली आहे. 31 ऑक्टोबर 2023 रोजी विद्यापीठ विकास मंच गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या सिनेट सदस्यांनी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे व कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांना एका निवेदनाद्वारे ‘विद्यापीठ विकासासाठी एक तास’ या विषयावर अधिसभेत चर्चा घडवून आणण्याची विनंती केली होती.gondwana-chandrapur
 
 
 
gondwana-chandrapur
 
 
gondwana-chandrapur ही विनंती डॉ. बोकारे यांनी सहर्ष स्वीकारली आणि यंदाच्या अधिसभेत त्यावर चर्चाही घडवून आणली. चर्चेतील मुद्दांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. निवेदन देणार्‍या शिष्टमंडळात सिनेट सदस्य तथा विद्यापीठ विकास मंचचे निमंत्रक स्वरूप तारगे, संजय रामगिरवार, प्रशांत दोंतुलवार, गुरूदास कामडी, स्वप्निल दोंतुलवार, यश बांगडे, धमेंद्र मुनघाटे, किरण गजपुरे, डॉ. सागर वझे, विजय बदखल, सतिश चिचघरे, प्रंचित पोरेड्डीवार, विजय घरत, प्रा. सुधीर हुंगे, पियुष मामीडवार प्रभृती उपस्थित होते. gondwana-chandrapur
 
 
अधिसभेत चर्चा करण्याविषयीची ही मागणी मान्य केली त्याबाबत सर्वांनी कुलगुरू डॉ. बोकारे यांचे आभार मानले. तसेच विद्यापीठ विकासाबाबत हा अभिनव आणि स्तुत्य प्रयोग निश्चितच यशस्वी होईल, असा विश्वासही व्यक्त आहे. दरवर्षी विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयातून जवळपास 15 ते 20 हजार विद्यार्थी उत्तीर्ण होऊन बाहेर पडतात. gondwana-chandrapur त्यापैकी किती विद्यार्थ्यांना नोकर्‍या लागतात किंवा किती विद्यार्थी स्वयंरोजगार करतात? तर, ही संख्या अत्यल्प आहे. हे वास्तव आम्ही नाकारू शकत नाही. हे बेरोजगार विद्यार्थी हाताला काम नाही म्हणून अनुचित कार्याकडे वळतात, हेही नाकारता येत नाही. या गंभीर समस्येवरच्या उपायांवर आपण या एक तासात चर्चा करण्यात आली.
 
 
gondwana-chandrapur तसेच विद्याापीठाचा परिक्षेवर होणारा प्रचंड खर्च आणि त्यामुळे वाढलेले परीक्षा शुल्क कमी केले पाहिजे. त्यासाठी काय करता येईल, तंत्रज्ञानाचा उपयोग करून सर्व डिजिटलाइज करता येईल का, यावरही यावेळी चर्चा झाली. सर्वसामान्य जनता विद्यापीठाकडे आज कसे बघत आहे? विद्यापीठामुळे त्यांच्या जीवनमानात काही फरक पडतो आहे का? विद्यापीठाकडून ते काही अपेक्षा करू शकतात का? याचीही चाचपणी आपण या चर्चेत झाली. gondwana-chandrapur यासह अनेक विषयांवर जवळपास सार्‍याच सिनेट सदस्यांनी यावर चर्चा केली. विषय एक तास चर्चेचा असला, तरी यावर जवळपास दोन-अडीच तास चर्चा घडून आली.
 
लवकरच यावर एक श्वेतपत्रिका : कुलगुरू डॉ. बोकारे
‘विद्यापीठ विकासासाठी एक तास’ ही चर्चा अत्यंत फलदायी ठरणार आहे. gondwana-chandrapur अशा पध्दतीची चर्चा होणे गरजेचे होते. यामुळे विद्याापीठ विकासाला एक दिशा मिळेल आणि प्रत्यक्ष व्यवहारातील अडचणी दूर करून विद्यापीठाला पुढे नेता येईल. या चर्चेचा सार काढून त्यावर एक श्वेतपत्रिका लवकरच तयार केली जाईल आणि गरज भासल्यास तातडीचे अधिसभा आयोजित करून या आराखड्याला मंजुरी दिली जाईल, असे आश्वासन कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी यावेळी दिले.
Powered By Sangraha 9.0