राष्ट्रीय आदिवासी परिषेदत कुलसंगे यांची हजेरी

25 Nov 2023 19:30:50
गडचिरोली, 
 
tribals-jharkhand आदिवासी कार्यकर्ते व साहित्यिक वसंतराव कुलसंगे यांनी नुकतेच झारखंडमधील टाटानगर येथे टाटा स्टील फाऊंडेशनच्या वतीने आयोजित राष्ट्रीय आदिवासी संमेलनसंवाद 2023 मध्ये सहभाग घेतला. tribals-jharkhand आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आदिवासींशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या समस्या तसेच त्यांची संस्कृती समजून घेण्यासाठी या पाच दिवसीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. tribals-jharkhand या संमेलनात कुलसंगे यांनी आदिवासींच्या ज्वलंत प्रश्‍नांवर व्याख्यान करून त्यांचा जल-जंगल-जमीन संघर्ष मांडून शासनाचे लक्ष वेधले. त्यांनी रावणावर स्वरचित कविता देखील सादर केली.
 
 

tribals-jharkhand 
 
 
कुलसंगे यांनी आदिवासी, त्यांची संस्कृती आणि परंपरा यांच्यासाठी केलेले कार्य आणि संघर्ष लक्षात घेऊन त्यांना या संमेलनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. tribals-jharkhand यात देशातील 28 राज्यांतील प्रतिनिधी त्यांच्या पारंपरिक पोशाखासह सहभागी झाले होते. कुलसंगे यांनी इतर प्रतिनिधींशीही संवाद साधून त्यांची आदिवासी समस्यांवरील मते जाणून घेतली. विविध राज्यातील आदिवासी समस्या समजून घेण्यासाठी आणि त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संवाद साधण्यासाठी हा कॉन्क्लेव्ह उपयुक्त ठरला, असे कुलसंगे म्हणाले. संमेलनात सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आले. tribals-jharkhand या राष्ट्रीय आदिवासी संमेलनात कुलसंगे यांच्यासह जिल्ह्यातील आदिवासी कार्यकर्ते भामरागड येथील डॉ. चिन्ना महाका, दादाराम कुसराम, अंकुश कोकोडे, प्रेमकुमार चौके, महेश कुमरे, बाली महाका, गंगाधर शेडमाके, शांताबाई येरमे सहभागी झाले होते.
 
Powered By Sangraha 9.0