पार्क केलेल्या कारला आग, दोघांचा मृत्यू

    दिनांक :26-Nov-2023
Total Views |
नोएडा,
Parked car caught fire उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील नोएडा येथे शनिवारी सकाळी पार्क केलेल्या वाहनातील दोन अभियंत्यांचा जाळून मृत्यू झाला. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना सकाळी 6.11 वाजता सेक्टर-119 येथील आम्रपाली प्लॅटिनम सोसायटीजवळ घडली.
 
Parked car caught fire
 
त्यांनी सांगितले की, सोसायटीतील विजय चौधरी (27) आणि सेक्टर-53 मध्ये राहणारे अनस (27) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही व्यवसायाने इंजिनिअर आहेत. सकाळी एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार येथे थांबली आणि तीन मिनिटांनी  कारने आग पकडली, असे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. Parked car caught fire काही वेळाने अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला होता. पोलीस विविध पैलू डोळ्यासमोर ठेवून तपास करत आहेत.