नागपूर,
rain in Nagpur भारतीय हवामानशास्त्र विभागाने महाराष्ट्र, राजस्थान आणि नैऋत्य मध्य प्रदेशातील विविध भागात सोमवारी पहाटे पाऊस पडला असून नागपुरात अनेक भागात हलक्या पावसाच्या सारी बरसल्या. हवामान खात्याने पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या विविध भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील दोन दिवस हा पाऊस राहणारे असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे. आयएमडीनुसार, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकमध्ये वीजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, उत्तर कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
![fer5423 fer5423](https://www.tarunbharat.net/Encyc/2023/11/27/fer5423_202311271020379011_H@@IGHT_400_W@@IDTH_600.jpg)
तत्पूर्वी, मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने रविवारी महाराष्ट्राच्या विविध भागात वादळासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. पालघर, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत मुसळधार पाऊस तर ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार rain in Nagpur वाशीम जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरण असून रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा, मानोरासह वाशिम तालुक्यात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने मध्यरात्रीपासून काही ठिकाणी जोरदार तर काही भागात अद्यापही रिमझिम पाऊस सुरुच आहे. आयएमडीच्या माहितीनुसार तामिळनाडू, पुदुच्चेरीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, 27 आणि 28 नोव्हेंबरला विदर्भात मुसधार पावसाची शक्यता आहे. याचदरम्यान मध्य प्रदेशातील दक्षिण पश्चिम भागातही पुढील दोन दिवसांसाठी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार उत्तराखंड, राजस्थानचा दक्षिण भाग इथं गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.