नागपूर,
Dr. Vidya Nair : नायरसन्स समूह आणि ऑरेंज सिटी हॉस्पिटलचे संस्थापक उदयभास्कर नायर यांच्या कन्या डॉ. विद्या नायर यांनी ऑरेंज सिटी हॉस्पिटलच्या नव्या अध्यक्ष राहणार आहेत. उदयभास्कर नायर अध्यक्ष म्हणून निवृत्त होत आहेत. मात्र, सल्लागार म्हणून त्यांचे मार्गदर्शन कायम राहणार आहे.
डॉ. विद्या Dr. Vidya Nair मागील 27 वर्षांपासून ऑरेंज सिटी हॉस्पिटलच्या धोरणात्मक नियोजन आणिअंमलबजावणीत आपले योगदान देत आहेत. रुग्णालयात रूजू होण्यापूर्वी त्यांनी वॉशिंग्टन डीसी येथील वेटल्स अफेयर्स मेडिकल सेंटर आणि न्यू यॉर्कमधील रिचमंड युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरमध्ये मानसोपचार विषयात ईसीएफएमजी प्रमाणित चिकित्सक म्हणून काम केले आहे. त्यांनी जॉर्ज टाऊन युनिव्हर्सिटी, युएसए येथे अंतर्गत औषध विभागासाठी संशोधनाचे कार्य केले आहे. डॉ. विद्या यांनी जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये आरोग्य सेवा व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले.
2017 मध्ये भारतात परत आल्यावर डॉ. विद्या Dr. Vidya Nair यांच्या नेतृत्वात 2018 मध्ये ऑरेंज सिटी हॉस्पिटल एनएबीएच (नॅशनल अॅकि‘डेशन बोर्ड ऑफ हॉस्पिटल्स) मान्यता मिळविणारे शहरातील पहिले आणि देशातील 50 रुग्णालयांपैकी एक होते. डॉ. विद्या यांनी प्रोजेक्ट गीतामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यात श्रवणदोष असलेल्या वंचित मुलांसाठी कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया केल्या जातात. यात ऑरेंज सिटी हे टाटा ट्रस्टसोबत भागीदारी करणारे मध्य भारतातील एकमेव खाजगी रुग्णालय आहे. भारतातील सर्वांत वेगाने वाढणार्या पहिल्या पाच शहरांमध्ये नागपूरचा समावेश असल्याने ही वाढ सामावून घेण्यासाठी आरोग्य कॅम्पस तयार करणे हे डॉ. विद्या Dr. Vidya Nair यांचे प्रमुख लक्ष्य राहणार आहे. सामान्यांसाठीही सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हाव्या यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचेही डॉ. विद्या सांगतात.