चेन्नई
IIT Madras professor suspended आयआयटी मद्रासमधील संशोधक विद्यार्थी सचिन जैन याच्या आत्महत्येप्रकरणी प्रशासनाने कडक कारवाई केली आहे. या प्रकरणी संस्थेचे प्राध्यापक आशिष कुमार सेन यांना निलंबित करण्यात आले आहे. ३१ मार्च २०२३ रोजी आयआयटी मद्रासमध्ये मेकॅनिकल विभागात संशोधन करणाऱ्या सचिन जैन नावाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. या घटनेनंतर सचिनचे सहकारी विद्यार्थी आंदोलनात उतरले आणि सचिन जैन या विद्यार्थ्याच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा व्हावी, अशी मागणी केली.

आयआयटी मद्रास व्यवस्थापनाने त्यांच्याशी बोलून विद्यार्थ्याच्या आत्महत्येची योग्य चौकशी केली जाईल असे आश्वासन दिले. यानंतर, 25 एप्रिल 2023 रोजी, निवृत्त आयएएस अधिकारी थिलकवठी यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय तपास पथक तयार करण्यात आले. या समितीने विद्यार्थी आणि पालकांकडून ईमेलद्वारे आणि वैयक्तिकरित्या पुनरावलोकने मागवली आणि आयआयटी प्रशासनाला 300 पानांचा अहवाल सादर केला. IIT Madras professor suspended याशिवाय, विद्यार्थी आत्महत्येच्या मुद्द्यावर थिलागावठी आयएएस समितीने आयआयटी मद्रास प्रशासनाला सादर केलेल्या अहवालात प्राध्यापक पदावरून हटवण्याची शिफारस केल्यानंतर प्राध्यापक आशिष कुमार सेन यांना निलंबित करण्यात आल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन जैन हा पश्चिम बंगालचा रहिवासी असून तो मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये पीएचडी करत होता. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक व्हॉट्सअँप स्टेटस पोस्ट केले होते, जे पाहून त्याचे मित्र घाबरले आणि त्याच्या घरी पोहोचले पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.