रेल्वे स्थानकातील लिफ्टमध्ये अडकले प्रवासी

पत्रकारांच्या सतर्कतेने निघाले बाहेर

    दिनांक :28-Nov-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
धामणगांव रेल्वे, 
Railway station lift : लिफ्टमध्ये एक तास अडकलेले प्रवासी रेल्वे सल्लागार समिती सदस्य पत्रकार कमल छांगाणी व पत्रकार मनीष मुंदडा यांच्या सतर्कतेने सुखरुप बाहेर निघाले. मंगळवार, 28 नोव्हेंबरला सकाळी 6.35 ला मुंबईवरून रेल्वे प्रवास करून धामणगाव रेल्वे स्थानकावर आलेले प्रवासी बाहेर जाण्यासाठी लिफ्टने निघाले. मात्र रेल्वे स्टेशनवरील लिफ्ट मध्येच अडकल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली.
 
Railway station lift
 
यातील एका प्रवाशाने ताबडतोब तेथील Railway station lift  रेल्वे सल्लागार समिती सदस्य पत्रकार कमल छांगाणी व पत्रकार मनीष मुंदडा यांना फोन करून माहिती दिली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता स्टेशन अधीक्षक जे. डी. कुलकर्णी आणि रेल्वे पोलिस फोर्स पथकाला माहिती दिली. रेल्वे आणि आरपीएफ प्रशनासाने तत्काळ पाऊले उचलत त्रांत्रिक कर्मचार्‍यांच्या मदतीने दोन मजल्याच्यामध्ये अडकलेली लिफ्ट खाली आणून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. प्रवाशांमध्ये यवतमाळ येथील पत्रकार अशोक बानोरे, प्रा. दीपक अंबरते, मंगेश पेठे आणि नरेंद्र गुप्ता यांचा समावेश होता. तब्बल एक तास प्रवाशांना लिफ्टच्या आतमध्ये राहावे लागले. रेल्वेची ही लिफ्ट अनेक वेळा नादुरुस्त असते. त्यामुळे या लिफ्टमध्ये असे प्रकार पाहावयास मिळतात. यापूर्वी सुद्धा अनेक प्रवाशांची अशाच प्रकारे तारांबळ उडालेली आहे.
 
 
स्टेशन प्रबंधक जे. डी. कुलकर्णी, Railway station lift  रेल्वे सुरक्षा बलाचे पोलिस निरीक्षक छेदीलाल कनोजिया यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस उपनिरीक्षक शशिकांत गजभिये, उपनिरीक्षक मीना, हेड कॉन्स्टेबल संजय खंडारे, राहुल यादव, रेल्वे प्रशासनातील विद्युत विभागातील सत्यम दुबे, पॉईंटमन संजय काळे, प्रवीण यांनी मोलाची कामगिरी बजावली. यादरम्यान प्रवाशांमधील अंबर्ते यांनी रेल्वेच्या मदत केंद्रातील 139 क्रमांकावर सुद्धा संपर्क केला. प्रवाशांना सुरक्षा जवानांनी रेल्वे पोलिस बल कार्यालयात आणून चहापान करून यथोचित सम्मान केला. प्रवाशांनीही रेल्वे अधिकारी, कर्मचारी आणि सुरक्षा बल पथकाचे आभार मानून आनंद व्यक्त केला. दरम्यान प्रवाशांनी रेल्वे सल्लागार समिती सदस्य पत्रकार छांगाणी व मुंदडा यांचेही आभार व्यक्त केले.