महिला सक्षमीकरणासाठी ‘पिंक रिक्षा’ योजना आणणार

29 Nov 2023 18:53:37
-आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई, 
महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या तसेच सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी राज्यातील महत्त्वाच्या शहरात 'Pink Rickshaw' scheme ‘पिंक रिक्षा’ ही योजना लवकरच सुरू करणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. मंत्रालयातील दालनात महिला व बालविकास विभागाच्या योजनांचा आढावा घेताना मंत्री तटकरे बोलत होत्या. तटकरे म्हणाल्या की, ही योजना परिपूर्ण करावी. यात लाभार्थी निवड, ई-रिक्षाला प्राधान्य देणे, बँकांची निवड तसेच प्रशिक्षण या सर्व बाबी तपासून घ्याव्या.
 
 
pink Riksha
 
'Pink Rickshaw' scheme : राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये ही योजना सुरू करणार असून, प्रायोगिक तत्त्वावर मुंबई, नवी मुंबई, नागपूर, पनवेल, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड व ठाणे या ठिकाणी ही सुरू करण्याचा मानस आहे. महिलांना सॅनिटरी पॅड पुरविण्यासाठी शासनाच्या सर्व विभागांशी समन्वय साधून गरजू लाभार्थी निवड निकष तपासून ही योजना यशस्वीपणे राज्यात राबवावी. महिला व बालविकास विभागाने शाळा, महाविद्यालये, गरीब व गरजू लाभार्थी महिला निवड यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून शेवटच्या घटकातील महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स पुरविण्याबाबत चोखपणे योजना राबवावी, अशा सूचना तटकरे यांनी दिल्या.
Powered By Sangraha 9.0