नागपूर,
Hospital डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाच्या भूमिपूजन आणि बांधकाम तात्काळ सुरु करण्याकरिता बनविण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर बचाव कृती समितीच्या वतीने सुरु असलेल्या बेमुदत जन आंदोलनात आज भर पावसात नागरिक मोठया संख्येने शामिल झाले होते. रजनीगंधा वाघमारे, गोपाल राजवाडे, रमेश अंबाडकर, आशा वासनिक, प्रेमलता बोद्रे, सिंधू चारभे आणि शोभा मेश्राम यांनी साखळी उपोषणात भाग घेतला होता.यावेळी आंदोलन स्थळी राज्याचे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, छाया खोब्रागडे, दिलीप जैस्वाल, दिनेश अंडरसहारे, संजय फुलझेले, सुरेश पाटील, वर्षा शामकुळे,योगेश लांजेवार,अशोक नगरारे , मंगेश बनसोड,मिलिंद मेश्राम,मुरली मेश्राम,सुनील लांजेवार, महेंद्र भांगे,श्रीमती द्रोणकर, प्रामुख्याने उपस्थित होते.
सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र इतरत्र हलविण्याचे षडयंत्र करुन नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आज या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी केला.Hospital हा प्रकल्प उत्तर नागपूरातच बांधण्यात यावा व तात्काळ भूमिपूजन करुन बांधकाम करण्याची मागणी यावेळी उपस्थित नागरिकांनी केली. विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संगठना एकत्रित येऊन आंदोलनात सहभागी झालेले झालेले होते.
सौजन्य: अशोक माटे,संपर्क मित्र