- मुख्यमंत्री शिंदेंच्या विरोधातील आक्षेपार्ह टिप्पणी भोवली
मुंबई,
मुंबईचे माजी महापौर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते Dutta Dalvi दत्ता दळवी यांना बुधवारी मुंबई पोलिसांनी अटक केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधातील आक्षेपार्ह टिप्पणी त्यांना भोवली आहे. मुंबईतील उपनगर भांडुप येथे उद्धव ठाकरे गटाच्या रविवारी झालेल्या बैठकीत दळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे तपासात आढळले, अशी माहिती भांडुप पोलिसांनी दिली.
त्या आधारे Dutta Dalvi दळवी यांच्याविरोधात भादंवितील कलम 153 (ए) (धर्म, जात, जन्मस्थान, निवास, भाषेच्या आधारे विविध समूहांत वैरभावना निर्माण करणे), 153 (बी) (राष्ट्रीय ऐक्यावर प्रतिकूल प्रभाव टाकणारे दावे), 294 (अश्लील कृत्ये आणि गाणी) आणि 504 (शांततेचा भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला. दळवी यांना बुधवारी भांडुप परिसरातून अटक करण्यात आली. या प्रकरणी तपास सुरू असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.