गंगाधरराव फडणवीस स्मृती डायग्नोेस्टिक सेंटरचे उद्या भूमिपूजन

-संदीप जोशी यांची माहिती

    दिनांक :29-Nov-2023
Total Views |
नागपूर, 
Gangadhar Fadnavis : श्री सिद्धीविनायक फाऊंडेशनतर्फे राजकीय क्षेत्रातील अग्रणी गंगाधरराव फडणवीस यांच्या कार्याच्या सन्मानार्थ गंगाधरराव फडणवीस स्मृती डायग्नोेस्टिक सेंटरची निर्मिती केली जात असून त्याचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती श्री सिद्धीविनायक फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
 
Gangadhar Fadnavis
 
वर्धा मार्गावरील पावनभूमितल्या श्रीरामनगरात शुक्रवारी 1 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम होईल. Gangadhar Fadnavis गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरमार्फत सर्वसामान्य नागरिकांना परवडेल तसेच शासकीय दरांपेक्षा अत्यल्प दरात एमआरआय सेंटर, सीटी स्कॅन सेंटर, एक्स रे, पॅथॉलॉजी त्याचप्रमाणे 25 डायलेसिस मशिनने परिपूर्ण डायलेसिस सेंटर निर्माण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. नागपूर सुधार प्रन्यासने तीस वर्षांच्या लीजवर दिलेल्या 16 हजार वर्गफुटाच्या भूखंडावर तीन मजली इमारत उभारण्यात येणार आहे. इमारतीच्या तळ मजल्यावर पार्किंग, रुग्णांसाठी प्रतीक्षागृह, कार्यालय ओपीडी कक्ष, पॅथॉलॉजी असेल. पहिल्या मजल्यावर एमआरआय सेंटर असेल. यात ‘थ्री टेस्ला’ अशा अत्युच्च तंत्रज्ञानाने परिपूर्ण दोन एमआरआय मशिन्स, अत्यंत उच्च तंत्रज्ञानाची 128 स्लाईसची सीटी स्कॅन मशिन, अल्ट्रा साऊंड व एक्स-रे मशिन असेल.
 
 
याशिवाय दुसर्‍या मजल्यावर किडनीरोगग्रस्त रुग्णांसाठी 25 डायलेसिस मशिन्सने युक्त असे डायलेसिस सेंटरही अत्यल्प दरामध्ये पुरवण्याचे निश्चित करण्यात आले आहे. Gangadhar Fadnavis गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरमध्ये वरील सर्व सेवा या अत्यंत अल्प दरामध्ये पुरवल्या जाणार असून याचा फायदा सर्वसामान्य जनतेला होणार आहे.
 
 
श्री सिद्धीविनायक सेवा फाऊंडेशनद्वारे मेडिकलमध्ये उपचारास येणार्‍या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी 10 रुपयांत जेवण उपलब्ध करून देणारा ‘दीनदयाल थाली’ प्रकल्प, नागपूर शहर आणि परिसरातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत नागरिकांसाठी ‘दीनदयाल रुग्णसेवा प्रकल्प’, दीनदयाल फिरता दवाखाना, कोरोनामध्ये घरातील कर्ता पुरुष गमावलेल्या कुटुंबाला आधार देणारा ‘सोबत पालकत्व’ प्रकल्प अशा सेवाभावी प्रकल्पानंतर फाऊंडेशनद्वारे Gangadhar Fadnavis गंगाधरराव फडणवीस स्मृती डायग्नोस्टिक सेंटरची सुरुवात केली जात असल्याचे संदीप जोशी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला श्री सिद्धीविनायक फाऊंडेशनचे उपाध्यक्ष अमोल काळे, सचिव पराग सराफ, सहसचिव अ‍ॅड. अक्षय नाईक, कोषाध्यक्ष रितेश गावंडे उपस्थित होते.