हिंगणघाटात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा विद्युत कार्यालयाला घेराव

*कृषी पंपाचा विद्युत पुरवठा आठवडाभर दिवसा द्या : अतुल वांदिले

    दिनांक :03-Nov-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
हिंगणघाट, 
Hinganghat NCP : शेतातील कृषी पंपाचा विद्युत पुरवठा सातही दिवस दिवसा होत नसल्याने शेतकर्‍यांना रात्री शेतात पाणी ओलित करण्यासाठी जावे लागते. अंधारात ओलित करताना शेतकर्‍यांचा जीव सतत धोक्यात असतो. जंगली प्राण्यांचे शेतकर्‍यांवर हल्ले झाले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना सातही दिवस ओलिताकरिता वीज द्या मागणीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज 3 रोजी विद्युत मंडळाच्या उपविभागीय कार्यालयात घेराव घालण्यात आला.
 
Hinganghat NCP
 
शेतकर्‍यांच्या शेतातील कृषी पंपाचा वीज पुरवठा 3 दिवस रात्री व 4 दिवस दिवसा सुरू आहे. Hinganghat NCP शेतातील कृषी पंपाबाबत जे असलेले भारनियमन दिवसाचे बंद करण्यात यावे आणि दिवसा शेतकर्‍यांना शेतातील कृषी पंपाकरिता वीज पुरवठा सातही दिवस दिवसा देण्यात यावे याकरिता राकाँचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात कार्यकारी अभियंत्यांना हेमंत पावडे यांना निवेदन देण्यात आले.
 
 
शेतात दिवसा वीज पुरवठा सुरू नसल्याने शेतकर्‍याला अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. शेतकरी दिवसभर शेतात काम करत असतो आणि वीज पुरवठा रात्रीच्या वेळेस सुरू राहत असल्यामुळे त्याला रात्री देखील शेतात राहावे लागते. रात्री वन्यप्राण्यांचा कधीही हल्ला होऊ शकतो. त्यामुळे शेतकर्‍यांना जीवहानी व वित्तहानी होण्याची भीती नाकारता येत नाही. त्यांना आपला जीव मुठीत घेऊन शेतात पिकांना सिंचन करावे लागते. Hinganghat NCP जर जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात शेतकर्‍याचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला. वारंवार वीज पुरवठा खंडित होणे, वीज कमी दाब होणे, जास्त प्रमाणात लोड आल्यामुळे तारा तुटून पडणे आदींमुळे कृषिपंप आणि ट्रान्सफार्मर देखील नादुरुस्त आहे. यातून मोठे अपघात होण्याची भीती आहे. शेतातील कृषी पंपासाठी वीज पुरवठा महिन्याला तिसही दिवस सुरळीत चालू करावा. अन्यथा राकाँ रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा वांदिले यांनी दिला.
 
 
यावेळी प्रलय तेलंग, प्रशांत घवघवे, दशरथ ठाकरे, शरद जाधव, अमोल बोरकर, किशोर चांभारे, जावेद मिर्झा, सुधाकर वाढई, गोमाजी मोरे, सुनील भूते, हरिभाऊ तराळे, एकनाथ कैकाडी, नीलकंठ महाजन, संदेश मेश्राम, अजिंक्य गंडाईत, ज्ञानेश्वर गंडाईत, मुरलीधर निकुरे रामकृष्ण ठाकरे, प्रवीण पाटील, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.