संसद रत्नांनी आम्हाला सल्ला देऊ नये : सुनील तटकरे

03 Nov 2023 17:46:59
- प्रत्युत्तरात सुप्रिया सुळेंनी करून टाकली निलंबनाची मागणी
 
नवी दिल्ली, 
संसद रत्नांनी आम्हाला सल्ला देण्याच्या फंदात पडू नये, असे खासदार Sunil Tatkare सुनील तटकरे यांनी सुनावताच खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट तटकरे यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. मराठा आरक्षण आंदोलनात मनोज जरांगेंच्या उपोषणादरम्यान मराठा आंदोलकांनी सर्वपक्षीय नेत्यांवर गावबंदी लादली होती, पण त्यातून चतुराईने शरद पवार गटातील राकाँच्या नेत्यांना वगळले गेले होते. शरद पवार गटाचे नेते गावोगाव दौरे करीतच होते. मराठा आरक्षणासंदर्भात वेगवेगळे तोडगे समोर येत होते. त्याचवेळी मराठा आंदोलन एवढे पेटले की राकाँच्या दोन आमदारांची घरे जाळली गेली. त्याचा ठपका खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर ठेवला आणि मु‘यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या गटाला देवेंद्र फडणवीसांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला.
 
 
Sunil Tatkare
 
सुप्रिया सुळे यांच्या सावधगिरीच्या सल्ल्याबाबत Sunil Tatkare सुनील तटकरे यांना विचारल्यानंतर त्यांनी संसद रत्नांनी आम्हाला सल्ला देण्याच्या फंदात पडू नये. त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले असतील, तर त्याचे उत्तर भाजपाचे नेते देतील. ते देशात आणि राज्यात सत्तेवर आहेत. राजकारणात टीका टिप्पणी चालतेच, पण थोडेफार राजकारण आम्हालाही कळते. आम्ही अजित पवारांच्या नेतृत्वाखाली जी भूमिका घेतली, त्यावर ठाम आहोत, असा टोला सुप्रिया सुळे यांना हाणला.
 
 
सुप्रिया सुळे यांनी त्यावरची प्रतिक्रिया म्हणून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना पत्र लिहून Sunil Tatkare सुनील तटकरेंच्या निलंबनाची आठवण करून दिली. सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभेतील गटनेत्या आहेत. त्यामुळे त्यांनी राकाँतील फुटीनंतर ताबडतोब सुनील तटकरे यांचे निलंबन करण्याचे पत्र लोकसभा अध्यक्षांना पाठवले होते. पण, त्याचा रिमाइंडर गेले चार महिने पाठवला नव्हता. तो रिमाइंडर त्यांनी 3 नोव्हेंबरला पाठवला आणि त्यात त्यांनी, आपण 4 जुलैला सुनील तटकरे यांच्या निलंबनाचा अर्ज केला होता याची आठवण लोकसभा अध्यक्षांना करून दिली.
Powered By Sangraha 9.0