समाजकारणातून राष्ट्र उभारणी भाजपाचे ध्येय: माजीमंत्री बडोले

30 Nov 2023 20:09:13
अर्जुनी मोरगाव, 
Badole भाजपाचा कार्यकर्ता संस्कारी आहे. समाजसेवा, देशसेवा, राष्ट्रप्रेम या सिद्धांतावर एकनिष्ठ राहून कार्य करीत आहे. पुढील पिढीला सक्षम करण्यासाठी संस्कारांसह समाजसेवा, Badole देशसेवा या विचारांची शिकवण आवश्यक आहे. समाजाच्या अंतिम घटकाला न्याय देण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करून राष्ट्रउभारणी करणे हाच भाजपचा ध्येय असल्याचे प्रतिपादन माजीमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
 
 
Badole
 
ते तालुक्यातील इटीयाडोह धरण शिबिरात आयोजित दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजक म्हणून कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. भाजपा जिल्हाध्यक्ष यसूलाल उपराडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला हेमंत पटले, चामेश्‍वर गहाणे, कासिम जमा कुरेशी, भाजपा तालुका अध्यक्ष विजय कापगते, ममता भय्या, मनोज बोपचे, रामू मारवाडे, संजय बारेवार, लक्ष्मण भगत, लक्ष्मीकांत धनगाये, अशोक लंजे, राजहंस डोके, चेतन वडगाये उपस्थित होते. बडोले पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्वसामान्य नागरिकाला न्याय देण्याचे काम करीत आहेत. Badole शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, अर्धकुशल मजुरांसाठी 9 वर्षात अनेक कल्याणकारी योजना तयार केल्या. पंतप्रधान स्वनिधी आणि पंतप्रधान विश्‍वकर्मा ही क्रांतिकारी योजना आहे. तळागाळातल्या वंचितांसाठी ही योजना लाभदायी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, संविधान उद्देशिकेचे वाचन आणि शपथ घेण्यात आली. तसेच मुंबई येथील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शाहीदांना श्रद्धांजली वाहिण्यात आली. प्रसंगी हेमंत पटले, येसुलाल उपराडे यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन पंस उपसभापती होमराज पुस्तोडे यांनी केले. प्रास्ताविक गौरेश बावनकर यांनी मांडले. आभार मनोज बोपचे यांनी मानले.
Powered By Sangraha 9.0