वाघाच्या कातडीची तस्करी करणारे दोन आरोपी ताब्यात

30 Nov 2023 21:21:59
गडचिरोली,
Smuggling tiger skin : वाघाच्या कातडीची तस्करी करणार्‍या दोन आरोपींना जेरबंद करण्यात आल्याची कारवाई महाराष्ट्र व छत्तीसगड वनविभागाच्या अधिकार्‍यांनी 29 नोव्हेंबरच्या मध्यरात्री एटापल्लीजवळील जीवनगट्टा येथे केली. शामराव रमेश नरोटे (30) रा. वासामुंडी व अमजद खॉ अमीर खॉ पठाण (37) रा. एटापल्ली असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे.
 
Smuggling tiger skin
 
एटापल्लीपासून दोन किमी अंतरावर जीवनगट्टा मार्गावर एका मोटारसायकलवर दोन व्यक्ती संशयास्पद फिरत असल्याचे दिसून आले. सदर मोटारसायकलचा पाठलाग वन कर्मचार्‍यांनी करीत त्यांना पकडले. Smuggling tiger skin त्यांच्याकडे प्लास्टिक पिशवीत वाघाचे कातडे आढळून आल्याने दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन वनकायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. वाघाची शिकार नेमक्या कोणत्या परिसरात झाली, याचा शोध वनविभागाचे अधिकारी घेत आहेत. या प्रकरणातील काही आरोपी फरार असण्याची शक्यता असून त्यांचाही शोध घेण्यात येत आहे.
 
 
या कारवाईत आरोपींकडून वाघाची कातडी 1 नग, हिरोहोंडा मोटारसायकल 1 नग, मोबाईल 3 नग असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Smuggling tiger skin घटनेचा अधिक तपास भामरागड वनविभागाचे उपवनसंरक्षक शैलेशकुमार मीना, सहायक वनसंरक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनात एटापल्लीचे प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी सी. सी. भेडके करीत आहेत.
Powered By Sangraha 9.0