धाड,
Rashtra Sevika Samiti : आपला समाज संस्कार विसरत चालला आहे. आजच्या काळात हिंदू संस्कृतीवर मोठ्या प्रमाणात आक्रमण सुरु आहे. हिंदू लोकांवर होणार्या अत्याचार, धर्मांतरण, यामुळे समाज संकटात सापडला आहे. आपल्या संस्कृतीत वर्षभर साजरे होणारे सणामुळे भारतीय इतिहासाची परंपरा कायम टिकून आहे. त्याचे संगोपन सर्वांनी केले पाहिजे. असे आवाहन धर्म जागरण मातृ शक्ती प्रांत सहसंयोजीका प्रमुख वक्त्या पद्मजा अहिर यांनी उपस्थित मातृशक्तीला मार्गदर्शन करतांना सांगीतले
राष्ट्र सेविका समिती Rashtra Sevika Samiti शाखा धाड च्या वतीने विजयादशमी उत्सव व शस्रपुजन शनिवार दि. 4 रोजी विवेकानंद नगर स्थित श्री राम मंदिरात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून माधुरी सोनुने, विद्या जोशी प्रमुख अतिथी म्हणून मनोगत व्यक्त करतांना माधुरी सोनुने यांनी सांगितले की आसुरी शक्तीवर विजय मिळविण्यासाठी नारी शक्तीला महिषासुरमर्दिनी चे रुप धारण करुण धर्माचे जागरण करावे लागेल.
प्रमुख वक्त्या पद्मजा अहिर Rashtra Sevika Samiti यांनी कपाळावर कुंकू आणि हातात बांगडी घातल्यावर आपल्या शरीरावरती त्याचे काय परिणाम होतात त्याचे शास्त्रीय कारण सांगितले. कोणते दागिने घातल्याने काय होत. आपली वेषभूषा कशाप्रकारची असावी. स्वतःचे संरक्षण कसे करावे. आपण कसे राहतो, त्याचा मुलींवरती काय परिणाम होतो ते बघावं. मोबाईल आणि नेट याचा दुरुपयोग करू नये तसेच मुलींकडे दुर्लक्ष करू नये. आपल्या मुलींकडे लक्ष द्यावे जेणेकरून लव जिहाद मध्ये आपल्या मुली अडकणार नाही.
या Rashtra Sevika Samiti कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिचय सौ. विद्याताई जोशी यांनी केले. तर ऋणनिर्देश दिपाली खडके यांनी केले. शाखा संचलन भाग्यश्री जोशी, प्रार्थना कु. कार्तीकी जाधव, श्लोक खुशी शिंदे, अमृतवचन प्रियंका ठाकुर, सामुहिक गीत भाग्यश्री जोशी, वैयक्तिक गित कु .रेणुका जोशी, वंदेमातरम् मनिषा जोशी. यांनी सादर केले. यावेळी तरूण सेविकांनी सूर्य नमस्कार प्रात्यक्षिक व बाल सेविकांनी कृष्ण गीतावरील प्रात्यक्षिक सादर केले. या कार्यक्रमासाठी पत्रकार, नागरिक, माताभगिनी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.