भारत-पाक सीमेवर छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा

-मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या अनावरण

    दिनांक :06-Nov-2023
Total Views |
मुंबई,
Chhatrapati Shivaji Maharaj : काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेनजीकच्या 41 राष्ट्रीय रायफल (मराठा एलआय) याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकार्पण उद्या मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहे. यावेळी मुख्यमंत्री जवानांसोबत दिवाळी फराळाचा आनंद देखील घेणार आहेत.
 
Chhatrapati Shivaji Maharaj
 
‘आम्ही पुणेकर’ या संस्थेच्या पुढाकाराने Chhatrapati Shivaji Maharaj छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काश्मीरमधील कुपवाडा येथे बसविण्यासाठी आला आहे. 20 ऑक्टोबर रोजी मुंबई राजभवन येथून समारंभात छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अश्वारूढ पुतळ्यााचे ढोल ताशांच्या गजरात आणि ‘जय भवानी जय शिवाजी’च्या जयघोषात स्वागत करण्यात आले. तेथून राज्यपाल रमेश बैस, मु‘यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिरवी झेंडी दाखवून कुपवाडाकडे हा पुतळा मार्गस्थ करण्यात आला होता. महाराष्ट्रातून सुरू झालेला हा प्रवास सुमारे 2200 कि. मी. अंतर पार करीत एका आठवड्यात कुपवाडा येथे पोहोचला. रस्त्यातील महत्वाच्या शहरांमधील ऐतिहासिक स्थळांच्या ठिकाणी या पुतळ्याचे पूजन करतानाच स्वागतही करण्यात आले.
 
 
उद्या सकाळी दहाच्या सुमारास या Chhatrapati Shivaji Maharaj पुतळ्याचे लोकार्पण एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पुतळ्याच्या समोरच्या दिशेने असलेल्या पर्वंतरांगांच्या पलीकडे पाकिस्तान आहे. अश्वारूढ पुतळ्यावरील शिवाजी महाराजांचे मुख आणि तलवार पाकिस्तानच्या दिशेने असावे अशा पद्धतीने पुतळा बसविण्यात आला आहे. त्यासाठी सुमारे 1,800 ट्रक माती टाकून भराव करण्यात आला. शिवाय या भागातील हवामान, भूस्खलन याबाबी पाहता पक्के बांधकाम करून पाया तयार करण्यात आला आहे.