नागपूर,
teachers-nagpur महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर विभागातर्फे सोमवार, ६ नोव्हेंबरला सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते त्वरित वितरित करण्याबाबत teachers-nagpur व केंद्र शासनाने घोषित केल्याप्रमाणे १ जुलै २३ पासून ४ टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करण्याचे शासन आदेश निर्गमित करण्याबाबत सहायक उपसंचालक दीपेंद्र लोखंडे यांना निवेदन देण्यात आले.teachers-nagpur
teachers-nagpur याप्रसंगी राज्य कार्याध्यक्ष माजी शिक्षक आमदार नागो गाणार, राज्य महिला आघाडी प्रमुख पूजा चौधरी, विभागाचे कार्यवाह सुभाष गोतमारे, कार्यालय मंत्री सुधीर वारकर, हलमारे मॅडम, अध्यक्ष प्राथमिक विभाग रंजना कावळे, नागपूर शहराचे पदाधिकारी, शहर अध्यक्ष राजेंद्र पटले, शहर कार्यवाह प्रमोद बोढे, दीपक रेवतकर, अनिल डहाके, तालुका पदाधिकारी, सुनील शेळके, सुनील इलोरकर, विलास लाखे, विक्रम वानखेडे, विवेक दडमल व लेकुरवाळे सर उपस्थित होते. teachers-nagpur