तभा वृत्तसेवा
दर्यापूर,
Mahimapur historic well : अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात महिमापूर येथे पुरातन काळातील स्थापत्यकलेचा अजोड व अनोखा नमुना असलेली मोगलकालीन ऐतिहासिक सात मजली पायर्यांची विहीर आहे. परंतु अलीकडच्या काळात या विहिरीकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याने तिची दुर्दशा झाली होती. त्यामुळे आ. बळवंत वानखडे यांनी विहिरीच्या संवर्धनासह येथे येणार्या पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्पात निधीची मागणी केली होती. त्याअनुषंगाने राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या आदेशान्वये 2.88 कोटी रुपयांच्या कामास प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.
दर्यापूर तालुक्यात असलेली ही Mahimapur historic well ऐतिहासिक पायर्यांची विहिरी पाहण्याकरिता येथे अनेक पर्यटक व अभ्यासक भेट देत असतात. मात्र, ही विहीर जीर्ण होत असल्यामुळे या विहिरीची दुरुस्तीची कामे करणे आवश्यक होते. या विहिरीला पाहत असताना राजवाडा पाहिल्याचा भास होत असून विहिरीला 12 दरवाजे आहेत. विहीरीचे कोरीव काम अद्भूत आहे. या वैशिष्ट्यपूर्ण विहीरीचे जतन व संवर्धन करण्याची प्राचीन जाणकार व पर्यावरणप्रेमींची नितांत मागणी होती. जिल्हा वार्षिक योजनेमधून येथील जतन, संवर्धन तसेच पर्यटकांना मूलभूत सुविधा निर्माण होण्यासाठी अत्यल्प निधी प्राप्त होत होता.
सदर वैशिष्ट्यपूर्ण विहिरीचे जतन व संवर्धन करण्याच्या दृष्टीने शासनामार्फत विकास आराखडा तयार करून निधी उपलब्ध करून देण्याची नितांत आवश्यकता असल्याची मागणी आमदार बळवंत वानखडे यांनी शासनाला केली होती. तसेच या Mahimapur historic well भागातील ग्रामस्थांची देखील मागणी होती. आता या कामास प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून लवकरच महिमापूर येथील पायर्यांच्या विहिरीचा कायापालट होणार आहे.