मिहानमध्ये मदर डेअरीचा 500 कोटींचा प्रकल्प

08 Nov 2023 18:51:00
नागपूर,
Mihan Mother Dairy : मध्यवर्ती नागपूरसह संपूर्ण विदर्भातील 11 जिल्ह्यांतील दुग्धउत्पादक शेतकर्‍यांना लाभ मिळवून देण्यासाठी मिहान परिसरात लवकरच मदर डेअरी 500 कोटी रुपये गुंतवून डेअरी प्रकल्प उभारणार आहे. या डेअरी प्रकल्पात दररोज 30 लाख दूधाची गरज भासणार आहे. त्यामुळे विदर्भातील अनेक शेतकर्‍यांना दुग्धव्यवसाय करुन अतिरिक्त उत्पन्न मिळविता येणार आहे. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डची मदर डेअरी ही उपकंपनी आहे.

Mihan Mother Dairy
 
केंद्रीय मंत्री गडकरींचे प्रयत्न
मदर डेअरी प्रकल्प Mihan Mother Dairy नागपुरात आणण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सातत्याने कसोशीचे प्रयत्न केले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच मदर डेअरी प्रकल्प नागपुरात येत आहे. यासाठी मिहान परिसरात 10 हेक्टर जमीन नव्या युनिटसाठी दिल्या जाणार आहे. डेअरीच्या या नव्या युनिटमधून दुग्धजन्य पदार्थ देशभरात पुरवले जाणार आहे.
 
 
दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढली
मुख्यत: मदर डेअरी Mihan Mother Dairy खाद्यतेल, फळे आणि भाज्या, गोठवलेल्या भाज्या, कडधान्ये, फळांचे रस, जॅम इत्यादींव्यतिरिक्त पॅकेज केलेले आणि टोन्ड दूध विकते.कोरोनाच्या महामारीनंतर पॅकेज केलेले खाद्यपदार्थ आणि शीतपेयांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. मिहान परिसरात मदर डेअरीचे युनिट सुरु झाल्यानंतर येथून दक्षिण भारतात डेअरीचे विविध खाद्यपदार्थ पाठविल्या जाणार आहे.
 
 
दुग्धव्यवसाय वाढणार
विदर्भातील दुग्धव्यवसायाला चालना देणारा हा प्रकल्प सुरु झाल्यानंतर दूध उत्पादक शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती अधिक भक्कम होणार आहे. याशिवाय Mihan Mother Dairy दूधाचा पुरक व्यवसाय करणार्‍यांनी दूध विक्रीची चिंता सोडून दुग्धव्यवसाय वाढविण्यासाठी आतापासून नियोजन करण्याची गरज आहे.
Powered By Sangraha 9.0