उठ पंढरीच्या राया, फार वेळ झाला..!

09 Nov 2023 20:10:05
तभा वृत्तसेवा
दारव्हा,
Kakad Aarti : दारव्हा तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील अनेक मंदिरातून कार्तिक पौर्णिमेच्या दुसर्‍या दिवसापासून काकड दिंडीला सुरवात झाली आहे. अनेक मंदिरात फार पूर्र्वीपासून काकड दिंडींचे आयोजन केले जाते. श्रीविठ्ठल मंदिर, श्रीराम मंदिर. श्रीमुंगसाजी मंदिर. श्री गजानन महाराज मंदिर. नातुवाडी येथील श्रीहनुमान मंदिर तसेच विविध मंदिरांतून काकड आरती निघते.
 
Kakad Aarti
 
सकाळी 5 पासून मंदिरामध्ये Kakad Aarti  काकड आरतीला सुरवात होते. संतांनी रचलेल्या अभंगांद्वारे पांडुरंगाला आळविले जाते. उठ पंढरीच्या राजा फार वेळ झाला, संता आधिसंत कृपेचे सागर, सुंदरते ध्यान उभे विटेवरी, टाळ बोले चिपळिला नाच माझ्या संग, देवाजीच्या दारी आज रंगला अभंग, अशा अभंगांच्या माध्यमातून आळवितात. या उपक‘मातून मंगलमय वातावरण तयार होते. भल्या पहाटे वारकरी भजनी मंडळी व वृद्ध मंडळी बालगोपाल काकड आरतीला हजेरी लावतात.
Powered By Sangraha 9.0