राष्ट्रीय जनजागरण मंगल कलश यात्रेचे आरमोरीत स्वागत

सहकार महर्षी प्रकाश पोरेड्डीवार व आमदार गजबेंनी घेतले दर्शन

    दिनांक :09-Nov-2023
Total Views |
आरमोरी, 
Mangal Kalash Yatra : महाराष्ट्र अश्‍वमेध महायज्ञ 23 ते 28 जानेवारी 2024 या कालावधीत मुंबई महानगरीत संपन्न होत आहे. त्यानिमीत्ताने राष्ट्रीय जनजागरण मंगल कलश यात्रेचे आगमन आरमोरी नगरीत 8 नोव्हेंबर रोजी झाले. या दिव्य ज्योती कलश दर्शनाकरिता आमदार कृष्णा गजबे व सहकार महर्षी प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांनी उपस्थिती दर्शवून कलशाची रितसर पूजाअर्चा केली व कलश शोभायात्रेत सहभागी झाले.
 
Mangal Kalash Yatra
 
सदर यात्रेचे Mangal Kalash Yatra आगमन श्री दत्त मंदिर देवस्थान आरमोरी (बर्डी) येथे सकाळी 11 वाजता झाले. सदर यात्रा शिस्तबद्ध पद्धतीने आरमोरी शहरातील मुख्य मार्गाने पुढे बंजारी माता मंदीर येथे पोहचली. येथे भाविक भक्त, सेवाधिकारी व नागरिकांना श्री गायत्री अश्‍वमेध यज्ञाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हा सचिव नंदू पेट्टेवार, गायत्री परिवार शाखा आरमोरीचे सेवाधिकारी मोतीराम चापले, प्रभाकर कापकर, मधुकर दडमल, रमा हेमके, प्रा. गंगाधरराव जुआरे, वासुदेव प्रधान, कल्पना तिजारे, सुरेश जुआरे, शंकरराव बोरकर, कमल नखाते, अशोक मेश्राम, दिपकर माकडे, महादेव माकडे, भक्त मंडळी व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.