नेपाळ : हिंदू राजेशाही पुन्हा आणण्याची मागणी

01 Dec 2023 17:44:01
दखल
 
 
Nepal Hindu monarchy : केवळ चार दिवसांपूर्वी नेपाळचे राजे ज्ञानेंद्र यांचे समर्थन करणारे हजारो लोक काठमांडूच्या मध्यभागी पायी मोर्चा काढण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, पोलिसांनी त्यांना मोर्चा आयोजित करण्यापासून रोखले आणि लाठीमार व अश्रुधुराचाही अवलंब केला. आंदोलकांनी राजा ज्ञानेंद्र यांच्या समर्थनार्थ घोषणा देत संपूर्ण काठमांडू शहर दणाणून सोडले. राजेशाहीचे ते समर्थक नागरिक ‘राजतंत्र वापस लाओ-गणतंत्र को हटाओ’ अशा घोषणा देत होते.
काठमांडूत का होत आहेत आंदोलने?
Nepal Hindu monarchy : हिमालयीन देश नेपाळमधील राजकीय-सामाजिक वातावरणात एक वेगळीच खळबळ उडाली आहे. एक दशकाहून अधिक काळ राजकीय पेचप्रसंगातून जात असलेल्या या डोंगराळ देशातील मैदानी आणि डोंगराळ प्रांतात अनेक राजकीय प्रयोग झाले, पण ते सर्व एक एक करून अयशस्वी ठरले. एकेकाळी एकमेव घोषित हिंदू राष्ट्र म्हणून जगात प्रसिद्ध असलेल्या या देशाने लोकशाही सरकारांचे युग पुन्हा रुळावर येण्याआधीच घसरताना पाहिले.
 
Nepal Hindu monarchy
 
राजेशाहीचे शेवटचे राजे ज्ञानेंद्र यांच्या कार्यपद्धतीबाबत समाजाच्या एका वर्गात असंतोष निर्माण झाला होता. त्यानंतर सत्तेवर आलेले राजकीय पक्षांना आपला हा हिमालयीन देश हळूहळू चीनच्या तावडीत सापडताना पाहणे भाग पडले. भारतात शतकानुशतके अस्तित्वात असलेल्या रोटी-बेटी व्यवहाराला पद्धतशीरपणे हानी पोहोचवली जात होती. पण आता पुन्हा एकदा तेथील बहुसंख्य हिंदू लोकांमध्ये चैतन्य जागृत होत आहे. Nepal Hindu monarchy नेपाळ या आपल्या मातृभूमीला पुन्हा हिंदू राष्ट्र म्हणून प्रस्थापित करण्याची ही तयारी आहे का? राजेशाही परत आणण्याच्या मागणीला वेग आला आहे का? असे काही प्रश्न नेपाळच्या संदर्भात पुन्हा एकदा उपस्थित होताना दिसत आहेत.
 
 
नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांपासून तीव‘ झालेल्या या आंदोलन आणि निदर्शनांनी या प्रश्नांना जन्म दिला आहे. या देशाचे राज्यकर्ते असलेले राजा ज्ञानेंद्र शाह देव यांनी आपले पूर्वज स्वर्गीय राजा पृथ्वी नारायण शाह देव यांच्या पुतळ्याचे दोनच दिवसांपूर्वी लोकार्पण केल्याची बातमी आली आहे. झापा जिल्ह्यातील एका शाळेत हा पुतळा बसवण्यात आला आहे. राजा ज्ञानेंद्र हे देखील सध्या सोशल मीडियावर अतिशय सकि‘य दिसत आहेत. दरबारात आणि Nepal Hindu monarchy हिंदू सण-उत्सवात ते लोकांमध्ये जाऊन विधींनुसार पूजा-अर्चना करताना दिसत आहेत.
 
 
काठमांडून गेल्या तीन-चार दिवसांपासून जे धरणे-आंदोलन सुरू आहे, ते राजेशाही परत आणण्याच्या मागणीसाठी आवाज उठवत आहेत का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात नेपाळचे राजकीय विश्लेषक व्यग्र आहेत. गेल्या शनिवारी जेव्हा राजे ज्ञानेंद्र स्व. नारायण शाह देव यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यासाठी झापा येथे गेले होते तेव्हा तेथेही त्यांचे प्रचंड स्वागत करण्यात आले. लोकांचा उत्साह अतिशय ओसंडून वाहत होता. मात्र, पुतळा लोकार्पण समारंभात राजा ज्ञानेंद्र या विषयावर काहीही बोलले नाहीत. प्रसारमाध्यांचे प्रतिनिधी देखील तेथे उपस्थित होते, मात्र राजे ज्ञानेंद्र यांनी त्यांच्याशी काहीही चर्चा केली नाही. हा कार्यक्रम सुरू असतानाच राजधानी काठमांडूमध्ये राजेशाहीचे खंदे समर्थक, ज्येष्ठ नेते दुर्गा परसाई यांची नजरकैद मागे घेण्यात आली. तेथे पोलिस तैनात होते, त्यांनाही हटवण्यात आले. मात्र काठमांडूच्या आणखी एका भागात पोलिसांनी राजेशाहीच्या समर्थकांवर कडक कारवाई केली. Nepal Hindu monarchy पोलिसांनी आंदोलकांची मोठ्या प्रमाणावर धरपकड केली. राजधानीत सत्ताधारी सरकारविरोधात जनतेचा रोष वाढत असल्याचे दिसून येत आहे. सरकारच्या कारभारावर जोरदार टीका होत आहे. लोकशाही आणि राजेशाहीचे समर्थक तसेच विविध मानवाधिकार गट सरकारकडे बोट दाखवत आहेत.
 
 
मात्र सर्वसामान्य जनताच नाही तर राजकीय पक्षांचे नेतेही सरकारवर टीका करीत आहेत. ‘प्रचंड सरकार अराजकता निर्माण करणार्‍या घटकांपुढे शरणागती पत्करत असल्याचा’ ताजा आरोप माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी केला आहे. सरकार घटनाविरोधी कामात गुंतले असल्याची तक्रार राजेशाही समर्थक लोक आणि राजकीय पक्ष करीत आहेत. दुसरीकडे, प्रचंड सरकार सभा अर्थात संसदेचे अधिकार दडपत आहे म्हणून देशातील मानवाधिकार आयोग आणि इतर अनेक संघटना संतप्त आहेत. पंतप्रधान पुष्पकमल दहल ऊर्फ प्रचंड हे आतापर्यंत राजेशाही समर्थक आणि त्यांचे आंदोलन थांबवण्याबाबत गप्प का आहेत, त्यांच्यावर काही कारवाई करणार की नाही, जर कारवाई केलच तर ती कशाप्रकारची राहील असे प्रश्न मानवाधिकारवादी संघटना उपस्थित करीत आहेत.
 
 
केवळ तीन दिवसांपूर्वी, या पूर्वीच्या हिंदू राष्ट्राचे राजे ज्ञानेंद्र यांचे समर्थन करणारे हजारो लोक काठमांडूच्या मध्यभागी पायी मोर्चा काढण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, पोलिसांनी त्यांना मोर्चा आयोजित करण्यापासून रोखले आणि लाठीमार व अश्रुधुराचाही अवलंब केला. आंदोलकांनी राजा ज्ञानेंद्र यांच्या समर्थनार्थ घोषणा देत संपूर्ण काठमांडू शहर दणाणून सोडले. राजेशाहीचे ते समर्थक नागरिक ‘राजतंत्र वापस लाओ-गणतंत्र को हटाओ’ अशा घोषणा देत होते. कदाचित येत्या काही दिवसांचे धुके दूर होऊन राजकीय चित्र काहीसे स्पष्ट होईल. मात्र, नेपाळवर ताबा मिळवण्याची संधी पाहणार्‍या चीनला Nepal Hindu monarchy नेपाळमध्ये राजेशाही आणि तीही हिंदू व्यवस्था पुन्हा प्रस्थापित व्हावी, असे वाटणार नाही, हे देखील निश्चित आहे. बीजिंगमधील कम्युनिस्ट राजकारणी भारताच्या शेजारी आणि सांस्कृतिकदृष्ट्या समान राष्ट्राला हिंदू मूल्यांपासून दूर ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.
 
 
- पांचजन्य वरून आभार 
Powered By Sangraha 9.0