वार्षिक योजना निधी कालमर्यादेत खर्च करा : संजय राठोड

जिल्हा नियोजनचा 393 कोटींचा आराखडा मंजूर

    दिनांक :01-Dec-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
Sanjay Rathore : जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून विविध विभागांना निधी दिला जातो. हा निधी सर्व विभागांनी कालमर्यादेत खर्च करणे आवश्यक आहे. निधी वेळेत खर्च न झाल्याने परत गेल्यास संबंधित विभागांना जबाबदार धरण्यात येईल. योजनेतील विकास कामे गुणवत्तापूर्वकच झाली पाहिजेत, याची विशेष खबरदारी सर्वांनी घ्यावी, असे पालकमंत्री संजय राठोड Sanjay Rathore यांनी बजावले.
 
Sanjay Rathore
 
पालकमंत्र्यांच्या Sanjay Rathore अध्यक्षतेत झालेल्या जिल्हा नियोजन समिती सभेत त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला खासदार हेमंत पाटील, आमदार नीलय नाईक, आ. मदन येरावार, आ. डॉ. अशोक उईके, आ. धीरज लिंगाडे, आ. वजाहत मिर्झा, आ. डॉ. संदीप धुर्वे, आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, आ. नामदेव ससाने, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अदिवासी विकास प्रकल्प अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीधर वाडेकर व सर्व विभागप्रमुख हजर होते.
 
 
2024-25 या वर्षाच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेच्या 393 कोटी रुपयांच्या आराखड्यास बैठकीत मंजुरी देण्यात आली. गेल्या आर्थिक वर्षातील अपूर्ण कामांचा Sanjay Rathore पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. मागील आर्थिक वर्षातील कामे आतापर्यंत पूर्ण होणे आवश्यक होते. ती कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी. ज्या-ज्या विभागांची कामे अपूर्ण आहेत, ती तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
 
 
2023-24 मधील आतापर्यंतच्या खर्चाचा आढावा घेताना ही जास्तीत जास्त कामे जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करावी. त्यानंतर निवडणूक आचारसंहिता लागण्याची शक्यता पाहता कामांना वेग द्यावा. या आर्थिक वर्षात 400 कोटी रुपये वार्षिक योजनेत मंजूर असून विविध कामे व झालेल्या खर्चाची माहिती Sanjay Rathore पालकमंत्र्यांनी जाणून घेतली. जिल्हा नियोजनची मंजूर कामे काही कंत्राटदार अतिशय कमी दराने घेतात. अशा कामांची गुणवत्ता संबंधित अधिकार्‍यांनी तपासली पाहिजे. सुशिक्षित बेरोजगार अभियंता व मजूर संस्थेला कामवाटप करताना स्थानिक बेरोजगार अभियंता व सोसायटीला देता येईल का, हेही पहावे, असे ते म्हणाले.
एक हजार रोहित्र खरेदी करणार
शेतकर्‍यांना अखंडित वीजपुरवठा होण्यासाठी रोहित्र दुरुस्त असणे आवश्यक आहे. परंतु जिल्ह्यात पुरेसे रोहित्र नसल्याने ते रोहित्र जुने झाल्याने वीज पुरवठ्यात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे जिल्ह्यासाठी 1 हजार नवीन रोहित्र खरेदी करू, असे यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले. हे रोहित्र जिल्हाधिकार्‍यांच्या ताब्यात राहतील. तातडीच्या प्रसंगी आवश्यक तेथे त्यांचा उपयोग केला जाईल, असे Sanjay Rathore पालकमंत्र्यांनी सांगितले.
 
दिवसा 8 तास वीज द्या, बैठकीत ठराव
शेतकर्‍यांना आपल्या शेतात ओलित करण्यासाठी सलग आणि दिवसा वीज पुरवठा मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्याला दिवसा सलग आठ तास वीज मिळावी, अशा प्रस्ताव आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मांडला. सर्व सदस्यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला.
 
 
गांजा तस्करी, सेवनाचा स्वतंत्र आढावा
जिल्ह्यात गांजाची तस्करी होत असून सेवनाचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे, कमी वयातील मुलांमध्ये गांजाचे प्रमाण वाढत असल्याची बाब काही आमदारांनी बैठकीत उपस्थित केली. मुलांवर यामुळे होत असलेले वाईट परिणाम आणि जिल्ह्यात होत असलेली तस्करी पाहता या विषयावर स्वतंत्र बैठक होणे आवश्यक असल्याचे Sanjay Rathore पालकमंत्र्यांनी सांगितले.