तभा वृत्तसेवा
कारंजा (घा.),
Nitin Gadkari : कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील जनता दरबार गाठून येथील उड्डाणपुलाची रंगरंगोटी व सुशोभीकरण करण्यात यावी, या मागणीचे निवेदन दिले.
शहरातील नागरिकांची मागणी व गरज लक्षात घेता नागरिकांनी सुधीर दिवे यांच्या सहकार्याने केंद्रीयमंत्री Nitin Gadkari नितीन गडकरी यांच्याकडून कारंजा घाडगे येथे उड्डाणपूल मंजूर केला होता. त्या उड्डाणपुलाचे बांधकाम पुर्णत्वास जाऊन पुलावरून वाहतूकही सुरू झाली. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. याबद्दल स्थानिक नागरी समस्या संघर्ष समितीने जनता दरबारामध्ये जाऊन गडकरी व दिवे यांचे आभार व्यक्त केले. आता सदर उड्डाणपुलाची रंगरंगोटी व सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी केली. उड्डाणपुलाचे रंगरंगोटीकरण व सुशोभीकरण झाले तर शहरातील परिसराला सौंदर्य प्राप्त होईल पर्यायाने शहराच्या सौंदर्यकरणात भर पडेल, असे निवेदनामध्ये नागरी समितीने म्हटले आहे.
कारंजा शहर तालुक्याचे ठिकाण आहे. नागपूर शहरापासून केवळ 75 किलोमीटरवर वसलेले आहे. संपूर्ण तालुक्याची बाजारपेठ उड्डाण पुलालगतच्या परिसरात वसलेली आहे. उड्डाणपुलाच्या बाजूने तहसील कार्यालय, न्यायालय, शासकीय विश्रामगृह व शाळा-महाविद्यालयाच्या इमारती आहे. Nitin Gadkari सदर उड्डाणपूल हा शहराच्या विकासाचा आणि सौंदर्याचा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे नागपूर सारख्या मेट्रो सिटीतील उड्डाण पुलाच्या सौंदर्याप्रमाणे कारंजा (घा.) येथील उड्डाण पुलाचे रंगरंगोटीकरण व सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे. निवेदन देतेवेळी कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.