रविभवन,आमदार निवासात चहा, नाश्ता, जेवण स्वस्तच

10 Dec 2023 16:12:05
नागपूर,
Aamdar Niwas : आमदार निवासात चविष्ट , स्वस्त आणि मस्त जेवण मिळत असताना हिवाळी अधिवेशनातील मंत्री, आमदार, हॉटेल्समध्येच राहणे आणि जेवण करणे पसंद करीत आहे. रविभवन, आमदार निवासात सकाळचा चहा, नाश्ता,जेवण, दुपारचा चहा नाश्ता व रात्रीचे जेवण आदींसाठी चांगली व्यवस्था केली आहे. मात्र त्याकडे अनेकांनी पाठ फिरविली आहे.6 डिसेंबरपासून आमदार निवास, रवीभवन आदी ठिकाणी चहा नाश्ता, बॉटलीचे पाणी,जेवण आदींची व्यवस्था केल्यानंतर आमदार निवासातील कॅण्टीनमध्ये फारसे कोणीच दिसून येत नाही. गुरुवार व शुक्रवारी काही आमदार त्यांच्या कार्यकर्त्यांसह दिसून आले होते. परंतू शनिवार आणि रविवारी सुटी असल्याने आमदार निवास परिसर ओस पडल्याचे दिसून येत आहे. वास्तविक रवीभवन आणि Aamdar Niwas आमदार निवासात सर्व आमदारांसाठी चांगल्या दर्जाचे गरम जेवण कमी दरात उपलब्ध करुन दिले आहे.

Aamdar Niwas
कार्यकर्त्यांसह आमदार पर्यटनाला
मुख्यत: नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आमदारांसोबत त्यांचे कुटुंबियांसह कार्यकर्त्यांची फौज असते. शनिवार आणि रविवार सुटीचा दिवस आनंदात घालविण्यासाठी बहुतांश आमदार आपल्या कार्यकर्त्यांसह पर्यटनाला जात असतात. अधिवेशनाच्या निमित्त्याने मध्य भारतातील अनेक देवस्थान, पर्यटन स्थळांना भेटी देण्याचे नियोजित असते. त्यादष्टीने प्रत्येकांचे कार्यक्रम ठरलेले असते. आता पुन्हा सोमवार पासून तर शुक्रवार पर्यंत वर्दळ दिसणार आहे. यातही आमदार, मंत्री हॉटेल्समध्ये तर त्यांचे कार्यकर्ते रवीभवन आणि आमदार निवासात ठाण मांडून असतात. अधिवेशनासाठी संपूर्ण सरकार दाखल झाले असल्याने मंत्री व आमदारांच्या सेवेत अनेक कार्यकर्ते सातत्याने त्यांच्यासोबत आहे. Aamdar Niwas आमदार निवासातील कॅण्टीनमध्ये हजार ते दोन हजार व्यक्ती जेवण करु शकतील,अशी व्यवस्था येथे करण्यात आली आहे. मात्र पहिल्याच दिवसांपासून येथील कॅण्टीनकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे, तर शहराबाहेरील हॉटेल्स, सावजी भोजनालय, ढाबे आदी ठिकाणी गर्दी वाढली आहे.
 
 
100 रुपयांत एका व्यक्तीचे जेवण
रवी भवन, आमदार निवासात राहण्याची सर्व उत्तम व्यवस्था असताना अनेक Aamdar Niwas आमदार हॉटेल्समध्ये राहण्यास प्राधान्य देतात. केवळ कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी आमदार निवास किंवा रवीभवनात येतात. एकीकडे मोठ्या हॉटेलमध्ये एकवेळच्या जेवणासाठी 1,500 ते 2 हजार रुपये खर्च होत असताना आमदार निवासात केवळ एका व्यक्तीचे जेवण 100 रुपयांपेक्षा कमी दरात होते. मोठ्या हॉटेल्सच्या तुलनेत रवी भवन,आमदार निवासातील जेवण पूर्णत: दर्जेदार असल्याने हिवाळी अधिवेशनादरम्यान नेत्यांनी, आमदार निवासातील सुविधांचा आवश्य लाभ घ्यायलाच हवा.
 
कोट्यवधींचा खर्च
आमदार निवास आणि रवीभवनातील एकंदरीत संपूर्ण व्यवस्थेसाठी शासनाने कोट्यवधींचा खर्च केला आहे. जर काय रवी भवन आणि आमदार निवासात मंत्री, आमदार राहात नसेल तर शासनाचा खर्च व्यर्थ जात आहे. याशिवाय हॉटेल्सच्या खर्चामुळे शासनाचे बिल सतत वाढत आहे. Aamdar Niwas आमदार निवासातील कॅण्टीनमध्ये एका थाळीची किमत 50 रुपये तर मोठ्या हॉटेलमध्ये 500 ते 1500 रुपये प्रतिव्यक्ती खर्च येतो. तर रविभवनात व्हेज थाळीची 150 रुपये तर नॉनव्हेज थाळी 250 ते 300 रुपयात मिळते. यासोबतच पोहे, कचोरी, समोसा, बटाटा वडा, व्हेज कटलेट, उपमा, कांदे भजे, व्हेज सँडविच, हॉट मिल्क ग्लास व साबुदाना खिचडी 30 रुपयात मिळते. परंतु महागड्या हॉटेल्समध्ये थांबणार्‍या आमदारांना येथील स्वस्त जेवण, नाश्ता पसंत येत नसल्याने कॅण्टीन संचालकांना फटका बसत आहे.
Powered By Sangraha 9.0