पैदल जाणार्‍या मजूर महिलांवर पिकअप वाहन उलटले

    दिनांक :12-Dec-2023
Total Views |
- सहाजण जखमी

पांढरकवडा, 
सोमवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास कापूस वेचणी करून घराकडे येत असलेल्या महिला मजुरांवर Pickup vehicle accident पिकअप वाहन उलटल्याने सहा महिला मजूर गंभीर जखमी झाल्या. गावकर्‍यांनी जखमी महिलांना पांढरकवडा रुग्णालयात आणले असता त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून सर्व जखमी महिलांंना यवतमाळ रुग्णालयात हलविण्यात आले.
 
 
pikup
 
राष्ट्रीय महामार्ग क‘मांक 44 मार्गावरून मराठवाकडी येथील काही महिला शेतातील कापूस वेचणी करून घराकडे पैदल जात असताना पांढरकवडावरून बोरीकडे भरधाव वेगात असलेली हे वाहन त्यांच्या अंगावर जाऊन उलटली. त्यामध्ये या सर्व सहा महिला गंभीर जखमी झाल्या. या Pickup vehicle accident अपघातात करिष्मा महेश सोयाम (वय 24), बेबी आत्माराम आडे (वय 35), गायत्री विलास कनाके (वय 35), कार्तिका गंगाराम सोयाम (वय 45), रेणुका तुळशीराम आडे (वय 46), मनीषा गंगाप्रसाद आत्राम (वय 34) या सर्व गंभीर जखमी असल्यामुळे त्यांना यवतमाळला हलविण्यात आले असून अधिक तपास पांढरकवडा पोलिस करत आहेत.