अनिल अंबानी यांची आणखी एक कंपनी बुडाली

    दिनांक :14-Dec-2023
Total Views |
मुंबई, 
bankrupt उद्योगपती अनिल अंबानी गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक अडचणीत आहेत. यामुळे त्यांना त्यांच्या कंपन्या विकाव्या लागत आहेत. bankrupt अलिकडेच त्यांच्या रिलायन्स कॅपिटलच्या विक्रीसाठीही बोली लावण्यात आली होती. त्यानंतर आता भारतीय कंपनी लवादाने (एनसीएलटी) त्यांची आणखी एक दिवाळखोर कंपनी, रिलायन्स कम्युनिकेशनच्या रिअल इस्टेट मालमत्तांच्या विक्रीला मान्यता दिली आहे.
 
 
anil ambani
 
bankrupt रिलायन्सने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या रिझोल्यूशन प्रोफेशनलने केलेल्या अर्जाबाबत लवादाच्या मुंबई खंडपीठाचा आदेश जोडण्यात आला होता, ज्यात कंपनीच्या काही बेहिशेबी मालमत्तांच्या विक्रीसाठी एनसीएलटीकडून मंजुरी मागितली गेली होती. एनसीएलटीने त्याला मान्यता दिली आहे. रिलायन्स कम्युनिकेशनच्या विक्रीसाठी असलेल्या मालमत्तेत चेन्नईतील हड्डो कार्यालयाचा समावेश आहे. याशिवाय सुमारे ३.४४ एकर जमीन आहे. पुण्यातील ८७१ चौरस मीटरमध्ये पसरलेल्या कार्यालयदेखील विकले जाणार आहे. सोबतच कॅम्पियन प्रॉपर्टीजच्या शेअर्समधील गुंतवणूक आणि रिलायन्स रियल्टीच्या शेअर्समधील गुंतवणूकही विकली जाईल.