विश्लेषण
- पंकज जगन्नाथ जयस्वाल
Bharatmata : सनातन धर्मावर, भारतीय संस्कृतीवर आणि त्याच्या नीतिमूल्यांवर सतत हल्ले करणे ही राहुल गांधी, त्यांचा पक्ष आणि ‘इंडिया’ आघाडीच्या इतर अनेक नेत्यांसाठी नित्याचीच बाब झाली आहे. या सनातन समर्थकांच्या पाठिंब्यामुळेच त्यांचा केंद्रात आणि अनेक राज्यात प्रभाव कायम आहे, हे राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाचे नेते विसरतात. खेदाची बाब अशी की, सनातनच्या मूल्यांवर आधारित आणि जगाच्या कल्याणासाठी आपल्या महान राष्ट्राचे जे भव्य दिव्य चित्र अपेक्षित होते ते नष्ट करण्याचा या नकारात्मक राजकारण्यांचा दुष्ट खेळ अनेकांना अद्यापही कळलेला नाही.
‘भारत माता की जय’ या जयघोषासंदर्भातील अलिकडचा वाद एका नेत्याची महान भारतीय संस्कृतीची समज, तसेच त्यांची वरवरची विचार प्रक्रिया आणि 140 कोटी भारतीयांच्या कल्याणासाठी काम करण्याची अनिच्छा दर्शवितो. जेव्हा आपण भारताला माता म्हणून संबोधतो तेव्हा तो केवळ जमिनीच्या एक तुकडा नसतो, तर Bharatmata भारतमाता म्हणजे एक जागरूक, सचेतन, जिवंत देवताच असते, जी पिता आणि गुरू या दोन्ही गुणांचे प्रतीक आहे. माता म्हणजे दिव्यता, निरपेक्ष प्रेम, पुत्रांविषयी असलेली काळजी. आपल्या पुत्रांचे कल्याण व्हावे, त्यांना वाईट संगत लागू नये, त्यांना समाधान, शांती लाभावी अशीच मातेची इच्छा असते. अशा मातेचा कुणी तिरस्कार करू शकेल काय? जेव्हा आपण ‘भारत माता की जय’ म्हणतो, तेव्हा आमचा उद्देश काही हजार लोक गोळा करून त्यांना हा नारा देण्यासाठी पैसे द्यायचे हा हेतू नाही. सनातन संस्कृती जगाचे लक्ष वेधण्यासाठी वरवरच्या घोषणा करण्यावर कधीच विश्वास ठेवत नाही, तर त्याऐवजी माणसांना मानसिक शांती मिळवून देण्यासाठी सर्व स्तरातील लोकांना एकत्र करण्याचे कार्य करते, जी आजच्या जगात अतिशय दुर्मिळ गोष्ट झाली आहे. तसेच प्रत्येक व्यक्तीची सामाजिक-आर्थिक आध्यात्मिक उन्नती व्हावी, यावर भारतीय संस्कृतीचा भर असतो. एवढेच नव्हे तर पर्यावरणाची देखील भारतीय संस्कृती काळजी घेते. म्हणूनच जेव्हा कोणी ‘भारत माता की जय’ असे म्हणतो तेव्हा याचा अर्थ अतिशय व्यापक स्वरूपाचा असतो, हे लक्षात घेतले पाहिजे आणि म्हणूनच भारत माता की जय म्हणजे व्यक्तीचे सर्व स्तरावर कल्याण आणि सर्व दृष्टीने राष्ट्राचे संरक्षण आणि विकास होय.
आक्रमणे होऊनही टिकली सनातन संस्कृती
संपूर्ण जगाच्या इतिहासाचे अवलोकन केल्यास एक गोष्ट अगदी स्पष्टपणे दिसून येते की आक्रमणकर्त्यांनी अनेक संस्कृती नष्ट केल्या आहेत आणि त्यांचा विनाश घडवून आणला आहे. परंतु 200 हून अधिक क्रूर आक्रमणे होऊनही केवळ सनातन, हिंदू संस्कृतीच टिकून आहे. सनातन संस्कृती ही केवळ एक कल्पना, Bharatmata धारणा किंवा विचार नसून, प्रत्यक्ष व्यवहारात कार्य करणारी आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना विकसित करणारी एक वास्तविक जीवनपद्धती आहे. एक राष्ट्र म्हणून भारताविषयी, या मातृभूमीविषयी, जन्मभूमीविषयी कृतज्ञ राहिले पाहिजे, ही धारणा यामागे आहे, हे सखोल निरीक्षण केल्यावर दिसून येईल. मी जीवनात जे काही मिळवले आहे ते या महान देशामुळे आहे आणि समाज व राष्ट्राच्या हिताचे रक्षण करणे व त्यासाठी प्रयत्न करणे ही माझी जबाबदारी आहे, ही भावना सनातन संस्कृती बिंबवते.
सनातन संस्कृतीचे मोठे योगदान
ज्या लोकांनी प्रदीर्घ काळापासून पाश्चात्त्य संस्कृतीचा उदोउदो करीत सातत्याने सनातन धर्म आणि संस्कृतीचा अपमान केला त्यांनी मानवतेचे काय भले केले आहे या प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे. जगभरात वारंवार होणारी युद्धे, ज्याची परिणती दोन महायुद्धांमध्ये झाली तसेच नैसर्गिक संसाधनांची लूट, विकसनशील आणि गरीब देशांचे शोषण, सामाजिक असमतोल, नक्षलवाद, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक समस्यांमध्ये तसेच दहशतवादात तीव्र गतीने वाढ, मनःशांती गमावणे, अंमली पदार्थांच्या सेवनात होणारी वाढ, आत्महत्या, केवळ मोजक्या लोकांकडे एकवटलेली आर्थिक व राजकीय सत्ता, धर्मांतरण, कुटुंबव्यवस्था नष्ट झाल्याने घटस्फोटांचे वाढते प्रमाण हे सारे पाश्चात्त्य संस्कृतीच्या अंधानुकरणातून उद्भवले. Bharatmata कुणीही अशा संस्कृतीचा भाग बनू इच्छित नाही जी जगाला नष्ट करण्यास निघाली आहे. काही जण असा दावा करतील की या पाश्चात्त्य संस्कृतीमुळेच वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगती झाली आहे. मात्र, वस्तुस्थिती ही आहे की पाश्चात्त्य संस्कृतीचा जेव्हा उदयही झाला नव्हता, म्हणजे या संस्कृतीच्या जन्मापूर्वीही विविध शोध लागत होते, संशोधनाची प्रकि‘या सुरूच होती तसेच नवनिर्मिती होत होती. या मुद्यावर निश्चितच संशोधन करता येईल.
परंतु सत्य हे आहे की पाश्चात्त्य संस्कृतीच्या आधीही एक विकसित संस्कृती अस्तित्वात होती. त्या काळात वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगती भारतामध्ये झाली असल्याचे दिसून येते आणि त्या काळात सनातन संस्कृतीने संपूर्ण जगाला शांती, आपुलकी दिली तसेच पर्यावरणाचे रक्षण केले. अशा या Bharatmata महान व उदात्त भारतीय संस्कृतीचे हे राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते तिरस्कार करतात. पाकिस्तान, अफगाणिस्तान, पॅलेस्टाईन, तुर्कस्तान, युक्रेन किंवा त्यांनी अनेक वर्षांपासून जोपासलेल्या चुकीच्या संस्कृतीमुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असलेले काही युरोपीय देशांप्रमाणेच भारताला त्याच मार्गाने वळवण्याचा या नेत्यांचा डाव आहे का? एक जग म्हणून आपण हे स्पष्टपणे समजून घेतले पाहिजे की प्रत्येक व्यक्तीची जी काही म्हणून श्रद्धा आहे ती कायम राखली पाहिजे, परंतु प्रत्येकाने एकजूट होऊन सनातन धर्माच्या तत्त्वांचे शतकानुशतके पालन केले पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीला अपेक्षित असलेले परिणाम प्रत्यक्षात घडतात की नाही हे पाहिले पाहिजे. सनातन संस्कृतीच्या समर्थनार्थ जगातील सत्पुरुषांनी निर्भीडपणे पुढे आले पाहिजे.
ऑर्गनायझर वरून साभार