अखेर दीपक कोठारी घुसले शिवसेनेत

14 Dec 2023 21:20:06
- अभय इंगळे
 
दिग्रस, 
Deepak Kothari : उबाठा शिवसेनेचे नेते माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांचे खंदे समर्थक दीपक कोठारी अखेर बुधवार, 13 डिसेंबरला उबाठा गटाला फारकत देत मंत्री संजय राठोड यांच्यामार्फत शिंदे गटाच्या शिवसेनेत घुसलेत अर्थात त्यांचा प्रवेश झाला. कोठारी यांनी प्रवेशाचा मुहूर्त शोधला आणि शेकडो कार्यकर्त्यांसह परवा नागपूर गाठले. नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतच शिवसेनेत प्रवेश करण्याचा हट्ट त्यांनी धरल्याने मंत्री संजय राठोड यांनी त्यांना नागपूरला बोलावून घेतले होते.
 
Deepak Kothari
 
संध्याकाळी अधिवेशन संपल्यावर प्रवेशप्रक्रिया झाली. कोणत्याही राजकारण्यांना विरोधी पक्षातून आलेल्यांचा शेला पांघरुण लाड करावासा वाटतोच. तसाच लाड संजय राठोड यांच्या सांगण्यावरून मुख्यमंत्र्यांनी दीपक कोठारी यांचा केला, आणि या क्षणाचे छायाचित्र चांगले व्हायरल झाले. Deepak Kothari दीपक कोठारी यांची राजकीय क्षेत्रात फार काही मोठी पकड किंवा मोठा अनुभव असे काहीही नाही, दिग्रसच्या श्री दुर्गामाता चौकात यांचा शंभरेक घरांचा, परंतु संघटित श्वेतांबरी जैन समाज आहे. दीपक कोठारी यांचे वडिल स्व. बंडू कोठारी हे येथील सुपरिचित व्यक्तिमत्व.
 
 
त्यांच्या नावाचे वलयही एक दीपक कोठारी Deepak Kothari यांंच्याकडे चांगली एक जमेची बाजू असल्याने नगर परिषद निवडणुकीत त्यांना येथील लोकांनी नगरसेवक म्हणून निवडून दिले होते. ही राजकीय कारकीर्द दीपक कोठारी यांची आहे. इतर काही संस्थेत, सामाजिक संघटनेत ते पदाधिकारी आहेत याचा फारसा ते गवगवा करत नाहीत. संजय देशमुख यांच्या गोटातून दीपक कोठारी आपल्याकडे येताना गेल्या महिन्यात संजय राठोड हे 15 नोव्हेंबरला दीपक कोठारी यांच्या घरी जाऊन बसले होते. या बैठकीत दीपक कोठारी यांनी शिवसेनेत येतो असे सांगितले होते. ठरल्याप्रमाणे प्रवेश घेण्यासाठी Deepak Kothari दीपक दिग्रसहून नागपूरला गेले आणि रीतसर त्यांना शिवसेनेत घेण्याचा कार्यक‘म पार पडला.
संजय राठोड यांच्यासोबत
यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांचे विकासात्मक कार्य असो किंवा रुग्णांसाठीची धडपड, त्यांना अगदी वेळेवर मिळत असलेली मदत हे सारे माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. माझा सहभाग यात व्हावा. शहराच्या या नाविन्य विकासाला माझाही हातभार लागावा म्हणून मी यापुढे संजय राठोड यांच्याबरोबर काम करण्याचे ठरवून शिवसेनेत प्रवेश घेतला असल्याचे Deepak Kothari दीपक कोठारी म्हणाले.
हा प्रवेश हा स्वार्थासाठी
दीपक कोठारी माझ्याबरोबर होता, तेव्हा मी सत्तेत होतो, आज नाही म्हणून त्याने माझी साथ सोडली. याचा काही फरक मला पडत नाही. त्याच्या जाण्यामागे स्वार्थ आहे, अशी प्रतिक्रिया संजय देशमुख यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0