चार आडवड्यात प्रशासनाने न्यायालयाला उत्तर द्यावे

आमगाव येथील कोतवाल पदभरती प्रकरण

    दिनांक :15-Dec-2023
Total Views |
गोंदिया,
Kotwal Recruitment Case : जिल्ह्यातील देवरी उपविभागाअंतर्गत येणार्‍या आमगाव तालुक्यातील रिक्त कोतवाल पदभरती प्रकरणी न्यायालयाने शासनाला चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे बजावले आहे. जिल्ह्यात कोतवाल पदभरती प्रक्रीया चांगलीच वादाच्या भोवर्‍यात सापडली. स्थानिक प्रशासन पदभरती पारदर्शक झाल्याचे सांगत असले तरी यात मोठा गैरप्रकार झाल्याने अनेकांनी न्यायालयाचे द्वार ठोठावले. देवरी उप विभागातील आमगाव तालुक्यातील रिक्त पदांसाठी 26 जून 2023 रोजी जाहिरात प्रसिद्धर करण्यात आली. 30 जुलै रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली.
 
Kotwal Recruitment Case
 
31 जुलैला निकाल घोषित करून गुणवत्तेनुसार यादी जाहीर करण्यात आली. Kotwal Recruitment Case परीक्षा सदोष असल्याने अनेक तक्रारी वरिष्ठ अधिकार्‍यांकडे झाल्या. मात्र चौकशी झाली नाही. मुंडीपार येथील उमेदवार भूवनेंद्रकुमार कुरंजेकर याने नागपुर येथील महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण येथे धाव घेत प्रकरण दाखल केले. आज 15 डिसेंबर रोजी प्रकरणावर सुनावणी झाली. मॅटने सर्व प्रतिवादी जनरल सेक्रेटरी रेव्हेन्यू, गोंदियाचे जिल्हाधीकारी, देवरीचे एसडीओ, आमगावचे तहसीलदार यांना चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहे. अर्जदारातर्फे वकील अदिती पारधी यांनी बाजू मांडली.
 
 
महात्मा गांधी याच्या जंयतीनिमित्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान 2 ऑक्टोबर 2014 ला सुरू केले. मात्र अभियानाचे वर्ष 2015 असे गुण देणार्‍या अधिकार्‍याने मानले. अधिकार्‍यांची तयार केलेली मॉडेल एन्सर शीट चुकीच्या पद्धतीने तयार केली आहे. Kotwal Recruitment Case ही बाब अर्जदारांच्या वकिलांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिली. दरम्यान मॅटने प्रतिवादी महसूल विभागाचे सचिव जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्यासह कोतवालपदी नियुक्त उमेदवार भाग्यवान हरीणखेडे यांना चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहे.