कोळी महादेव जमातीचा भव्य मोर्चा

अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्याची मागणी

    दिनांक :15-Dec-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
अमरावती, 
Koli Mahadev tribe : अमरावती विभागातील कोळी महादेव जमातीचे लोक अनुसूचित जमाती व वैधता प्रमाणपत्र घेण्यासाठी पात्र आहे. परंतु, अमरावती विभागातील उपविभागीय अधिकारी व अनुसूचित जमाती पडताळणी समिती संसदेने केलेल्या 1976 च्या कायद्याचे उल्लंघन करून जमातीच्या लोकांना सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय लाभापासून वंचीत ठेवण्यात येत असल्याचा आरोप करून शुक्रवारी समाजबांधवांनी भव्य मोर्चा काढला.
 
Koli Mahadev tribe
 
कोळी महादेव जमातीच्या Koli Mahadev tribe मागणी मान्य व्हावी यासाठी राजेंद्र उर्फ बाबा जुवार व गजानन चुनकीकर हे 6 डिसेंबरपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहे. त्याच्या उपोषणाचा दहावा दिवस आहे. सरकारने अद्याप कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे कोळी महादेव जमातीच्या बांधवांनी शुक्रवारी इर्विन चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयपर्यंत विराट निषेध मोर्चा काढला. या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने कोळी महादेव जमातीचे लोक पारंपारिक दिंडीमध्ये सहभागी झाले होते.
 
 
मोर्चा आयुक्त कार्यालयावर पोहोचल्यावर उपोषणकर्ते बाबा जुवार व गजानन चुनकीकर यांनी मोर्चाला संबोधीत केले. त्यांनी सरकारला सोमवारपर्यंत जात प्रमाणपत्र देण्याचा अल्टीमेटम दिला. जर उपविभागीय अधिकारी यांनी सोमवारपर्यंत जात प्रमाणपत्र दिले नाही तर सोमवारी 18 डिसेंबरपासून प्रत्येक गावातील Koli Mahadev tribe कोळी महादेव जमातीचे नागरीक रस्त्यावर उतरून शासनाचा निषेध करतील. मोर्चामध्ये कोळी महादेव जमातीच्या नेत्यांनी आपले म्हणणे मांडले. यात भास्कर कोलटेके, रघुनाथ खडसे, सुधाकर घुगरे, अतुल देशमुख, प्रा. रवींद्र ढोरे, उमेश दंदे, मिरा कोलटेके, अ‍ॅड. सोनवने, माजी मंत्री डॉ. भांडे, विवेक जवंजाळ, जय जुवार, आकाश जुवार, शेखर जामनेकर, दिलीप जामनेकर, प्रकाश पाटील, अ‍ॅड. पंढरीनाथ डोंगरे, विलास सनगाळे यांच्यासह इतरांचा समावेश होता. मोर्चात मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते.